राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा समोर आला आहे. चिंताजनक बाब म्हणजे बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा पॉझिटिव्ह रुग्ण अधिक आढळले आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 46 हजार 393 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ओमायक्रॉनचे 416 रुग्ण आढळले आहेत.
राज्यामध्ये गेल्या 24 तासात 30 हजार 795 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा 94.3 टक्के इतका झाला आहे. तर 48 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर हा 1.9 टक्के इतका आहे.
राज्यात ओमायक्रॉनचे 416 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईत एकूण रुग्णांपैकी 321 ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात 3 हजार 568 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 231 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा 96 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा 105 दिवसांवर जाऊन पोहचला आहे.