महिंद्रा, हिरो इलेक्ट्रिकचे दहा लाख इलेक्ट्रिक वाहनांचे उद्दिष्ट

इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्मात्या हिरो इलेक्ट्रिकने आज भारतीय बाजारपेठेसाठी इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी महिंद्रा समूहासोबत संयुक्त उपक्रमाची (जॉइंट व्हेंचर) घोषणा केली. हिरो इलेक्ट्रिक आणि महिंद्रा समूह यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अंदाजे 150 कोटी रुपयांची आहे आणि पुढील पाच वर्षे ती सुरू राहील. महिंद्रा समूहासोबतच्या या संयुक्त भागीदारीच्या मदतीने, हिरो इलेक्ट्रिकचे या वर्षाच्या अखेरीस दरवर्षी दहा लाख इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे.

हिरो इलेक्ट्रिक आपल्या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढवण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रासोबत भागीदारी करत आहे. नवीन भागीदारीमुळे देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटचा विस्तार होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. हिरो इलेक्ट्रिक आपले ईव्ही उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी महिंद्राच्या सुविधेचा वापर करेल.

कंपन्यांनी संयुक्तपणे जाहीर केले आहे की महिंद्रा समूह हिरो इलेक्ट्रिकच्या सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक बाइक्स – ऑप्टिमा आणि NYX (Optima & NYX) इंदूरजवळील पीतमपूर प्लांटमध्ये तयार करेल. या नवीन प्लांटमुळे त्यांच्या लुधियाना सुविधेतून हिरो इलेक्ट्रिकचे उत्पादन वाढेल. कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, या नवीन भागीदारीमुळे 2022 पर्यंत दरवर्षी 10 लाख इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीची मागणी पूर्ण करण्यात कंपन्यांना मदत होईल.

Peugeot मोटरसायकलसाठी इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म विकसित करण्यात महिंद्राची भागीदारी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ही भागीदारी दोन्ही पक्षांना ईव्हीवरील खर्च, टाइमलाइन ऑप्टिमाइज करण्यात आणि संबंधित माहिती शेअर करण्यात मदत करेल.

या घोषणेवर बोलताना हीरो इलेक्ट्रिकचे एमडी नवीन मुंजाल म्हणाले की, “हिरो इलेक्ट्रिक कंपनी देशातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रात आघाडीवर आहे. बाजारात आपली मुळे आणखी खोलवर रुजवण्यासाठी आणि त्याचे नेतृत्व मजबूत करण्यासाठी, Hero Electric ने Mahindra Group सोबत भागीदारीची घोषणा केली आहे, जे इलेक्ट्रिक थ्री आणि फोर व्हीलर स्पेसमध्ये EV ट्रांजिशनचे नेतृत्व करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.