फुफ्फुस शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. फुफ्फुस निरोगी असल्यावर अनेक आजार उद्भवतात. जसे की दमा,न्यूमोनिया, क्षयरोग, फुफ्फुसांचा कर्करोग इत्यादी, म्हणून फुफ्फुसांची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून आपण फुफ्फुसांना निरोगी ठेवू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या.
◆ व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहार
आंबट फळे जसे- संत्री, लिंबू, टोमॅटो, किवी, स्ट्रॉबेरी, द्राक्षे, अननस, आंबे या मध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहाराचा सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहारात अँटी ऑक्सीडेन्ट असतात, जे श्वास घेल्यावर ऑक्सिजन सर्व अवयवांमध्ये पोहोचतात.
◆ लसणाचे सेवन
लसणाचे सेवन केल्याने कफ नाहीसा होतो. जेवल्यानंतर लसूण खाल्ले तर हे छाती स्वच्छ ठेवतो. लसणात अँटीऑक्सीडेंट असतात जे संसर्गाविरुद्ध लढतात आणि शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात.
◆ लायकोपिन समृद्ध आहाराचे सेवन
अन्नात असे आहार घ्यावे जे लायकोपिनने समृद्ध असावे जसे गाजर,टोमॅटो ,कलिंगड,पपई,बीटरूट आणि हिरव्यापालेभाज्या. अशा प्रकारच्या आहारात केरोटीनॉयड अँटीऑक्सीडेंट असते. जे दमापासून बचाव करण्यात मदत करते, तसेच हे खाल्ल्याने फुफ्फुसांचा कर्करोगाचा धोका कमी होतो.
◆ मनुकाचे सेवन
दररोज भिजत घातलेले मनुकाचे सेवन केल्याने फुफ्फुस बळकट होतात आणि त्यांची रोगांशी लढण्याची प्रतिकारक शक्ती देखील वाढते.
◆ तुळशीच्या पानाचे सेवन
फुफ्फुसांमध्ये कफ साचला असल्यास कफ काढण्यासाठी तुळशीचे कोरडे पान, काथ,कपूर आणि वेलची सम प्रमाणात मिसळून वाटून घ्या. आता या मध्ये नऊ पटीने साखर मिसळून दळून घ्या. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा खा. या मुळे फुफ्फुसातील जमलेला कफ दूर होईल.
◆ आपल्या प्रत्येकाच्या निरोगी आयुष्यासाठी एक पाऊल पुढे.
डॉ.प्रवीण केंगे,नाशिक