महाराष्ट्रातील प्रमुख प्रकाशन संस्था मेहता पब्लिकेशन हाऊसची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या सुनील मेहता यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं आहे. आज पुण्यात (Pune) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुनील मेहता गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील पूना हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होते. मात्र, अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं. आज सकाळी सुनील मेहता यांचं पार्थिव मेहता पब्लिकेशन हाऊसमध्ये सकाळी 9 ते 9.30 या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर मेहता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मेहता पब्लिकेशनचे संचालक सुनील मेहता यांना किडनी स्टोनवरील उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले होते. पण, उपचारादरम्यान एकेक अवयव फेल होत गेले. अखेरच्या दोन दिवसात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
सुनील मेहता यांनी महाराष्ट्रासह भारतातील प्रकाशन व्यवसायाला नवी दिशा देण्याचं काम केल. सुनील मेहता यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रकाशनासंदर्भात प्रतिनिधित्त्व केलं. 1986 मध्ये त्यांनी मेहता पब्लिकेशन हाऊसची धुरा सांभाळली होती. सुनील मेहता यांनी मेहता पब्लिकेशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय लेखकांचं साहित्य अुवादित करुन मराठीत कशा प्रकारे येईल, यासाठी प्रयत्न केले.
सुनील मेहता यांनी 1986 मध्ये मेहता पब्लिकेशन हाऊसची सूत्रं मिळाल्यानंतर या संस्थेला नावलौकिक मिळवून दिला. मराठीतील नामांकित साहित्यकृतीच्या प्रकाशनासह विविध भाषांमधील साहित्य मराठी भाषेत यावं म्हणून अनुवादित साहित्याला प्राधान्य दिलं. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित लेखक जेफ्री आर्चर, मायकल क्रायटन, रॉबिन कुक, फ्रेडरिक पोरसाईथ, लिस्टर मॅक्लीन , डेबोरा एलिस, झुम्पा लाहिरी यांच्यासह अनेक साहित्यिकांचं लेखन मराठीत आणण्यासाठी सुनील मेहता यांनी प्रयत्न केले.
सुनील मेहता किडनीच्या आजारामुळं रुग्णालयात दाखल होते. त्यांना अखेरच्या दोन दिवसांमध्ये दोन दिवस व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आलं होतं.काल 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी 9 ते 9.30 पर्यंत मेहता पब्लिशिंग हाऊसमध्ये सुनील मेहता यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येतील.