युनेस्कोच्या वेबसाईटवर आता भारतातील वारसा स्थळांची माहिती दिसणार

जागतिक हिंदी दिनानिमित्त (World Hindi Day) एक अत्यंत अभिमानास्पद गोष्ट घडली आहे. युनेस्कोच्या वेबसाईटवर आता भारतातील वारसा स्थळांची (UNESCO World Heritage Sites) माहिती ही हिंदी भाषेतदी दिली जाणार आहे. ही माहिती नुकतीच युनेस्कोच्या शिष्टमंडळानं जाहीर केली आहे. यामुळे आता हिंदी भाषेतूनही भारतातील वारसा स्थळांबाबत जाणून घेता येता येणं जगभरातील लोकांना शक्य होणार आहे. जागतिक हिंदी दिनानिमित्त ही घोषणा करत युनेस्कोनं भारतीयांना सुखद धक्का दिला आहे. भारतातील जागतिक वारसा स्थळांचे हिंदी भाषेतही वर्णन केलं जाणार आहे. तसंच हे वर्णत युनेस्कोच्या अधिकृत वेबसाईटवरही प्रकाशित केल जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. युनेस्कनं एक पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली असून भारतातील वारसा स्थळांबद्दल हिंदीतून माहिती प्रकाशित करण्याला परवानगी दिली असल्याचम मान्य केलंय. सोमवारी पॅरीसमध्ये याबाबती माहिती युनेस्कोच्या (UNESCO) शिष्टमंडळानं दिली.

युनेस्कोनं जारी केलेल्या पत्रात हिंदी भाषेतून माहिती प्रकाशित करण्याबाबत आनंद व्यक्त केला आहे. तसंच युनेस्कोचे जागतिक वारसा केंद्र हे भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असल्याचंही सांगण्यात आलं. हा एक ऐतिहासिक निर्णय असून त्याचं मनापासून स्वागत करत असल्याची भूमिका युनेस्कोच्या शिष्टमंडळानं व्यक्त केली आहे.

जागतिक हिंदी दिनानिमित्त परराष्ट्र मंत्रालयाकडून एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मिनाक्षी लेखी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसंच त्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षही होत्या. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही सहभाग घेतला होता. हिंदी भाषा आपल्या ज्ञान आणि संस्कृतीचा प्रसार करण्यात अत्यंत महत्त्वाची आणि मोठी भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

आयटीच्या क्षेत्रात हिंदीच्या वाढत्या वापरासोबतच, तरुणांमध्ये त्याची लोकप्रियता वाढतेय. ही गोष्ट हिंदीचं उज्ज्वल भवितव्य दाखवून देते, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. दरम्यान, एस जयशंकर यांनी आपल्या म्हटलंय की, आम्ही सगळे एकत्र येऊन हिंदीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी कटीबद्ध आहोत. त्यादृश्टीनं आम्ही सातत्यानं वाटचाल करत असून नवनवे उपक्रम राबवत आहोत, असंही त्यांनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.