ट्रॅक्टरला कार धडकल्याने अपघात, नांदेड जिल्ह्यात दोन पोलीसांचा जागीच मृत्यू

ट्रॅक्टरला कार धडकल्याने भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघं जण गंभीर जखमी झाले आहेत. नांदेडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नांदेड जिल्ह्यात भोकर- नांदेड रोडवर खरबी शिवारात हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता, की दोघांचाही जागीच मृत्यू झाला, तर दोघे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात दीपक जाधव आणि ईश्वर राठोड या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले, तर प्रितेश इटगाळकर आणि सदानंद सपकाळ हे दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

दोन्ही जखमी पोलिसांवर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अंधारात उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज आला नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लातूर-औरंगाबाद एसटी बसचा भीषण अपघात
दुसरीकडे, लातूर-औरंगाबाद एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर आठ प्रवासी जखमी झाले आहेत. बस आणि ट्रक यांची धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे बस अपघाताची घटना घडली. रविवारी सकाळी लातूर-अंबाजोगाई रोडवर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.