केंद्रीय सशस्त्र दलाच्या परीक्षेत महाराष्ट्राच्या भावना यादवचे यश

केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत मुंबईच्या भावना यादव हीने मोठे यश संपादन केले आहे. ती या परीक्षेत देशातून चौदावी आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येते. भावनाचे वडील देखील मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. भावना ही सहाय्यक फौजदार सुभाष यादव यांची कन्या आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे चार जानेवारी रोजी केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट पदासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये भावना ही देशातून चौदावी आली आहे.

या परीक्षेमध्ये एकूण 187 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये भावना यादव हीने चौदावा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून उत्तीर्ण होणारी ती एकमेव असून, तीने मुलीमधून पहिला क्रमांक पटकावला आहे. भावना हिचे प्राथमिक शिक्षण अंधेरीच्या सेंट झेवियर्स शाळेत झाले. त्यानंतर यादव कुटुंबीयांनी मीरारोडला स्थलांतर केल्यामुळे तिला शाळा बदावी लागली. तीने मीरारोडच्या शांतीपार्क येथील सेंट झेवियर्स शाळेमधून दहावी उतीर्ण केली. त्यानंतर तीने विरारच्या विवा महाविद्यालयातून आपले एमएसीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

भावनाचे वडील पोलीस दलात असल्यामुळे तीला देखील याच क्षेत्राची आवड होती. याच क्षेत्रामध्ये करीअर करण्याचा निश्चय तिने केला होता. त्यासाठी तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. मेहनत आणि जीद्दीच्या बळावर भावनाने हे यश मिळवले आहे. 2015 पासून ती युपीएससीची परीक्षा देत होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा ती दोन वेळा उत्तीर्ण देखील झाली होती. परंतु तीला मैदानी परीक्षेत अपयश आले. मात्र तिने खचून न जाता प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर आज तिची केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट पदासाठी निवड झाली असून, देशातून चौदावी येणाऱ्या बहुमान तिने पटकवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.