आज दि.२३ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

विधानसभेत शक्ती कायदा
एकमताने मंजूर

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (आज) विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर झाला. विरोधकांकडूनही या कायद्याचे स्वागत करण्यात आले आहे. अ‍ॅसीड हल्ला किंवा सामूहिक बलात्कार करून हत्या करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असलेला आणि त्यासाठी विशेष न्यायालयांच्या स्थापनेबाबतचा ‘शक्ति कायदा’ राज्य विधिमंडळाच्या बु हिवाळी अधिवेशनात संमत करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

देशात पहिल्यांदाच सीआरपीएफ
महिला कमांडोंचे पथक तयार

पहिल्यांदाच सीआरपीएफ महिला कमांडोंचे पथक तयार होत आहे. हे पथक देशातील व्हीआयपी लोकांना संरक्षण देईल. “आमच्या महिला कमांडोच्या पहिल्या तुकडीमध्ये ३२ महिला लढाऊ जवान आहेत, त्यांनी व्हीआयपी सुरक्षेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ते १५ जानेवारीपर्यंत तैनातीसाठी तयार होतील. आम्ही त्यांना आमच्या झेड प्लस संरक्षकांसोबत तपशीलवार माहिती देण्याचे ठरवले आहे,” असे सीआरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यातील २५ हजार महिला गायब
सरकारने विधानसभेत दिली माहिती

राज्यातील २५ हजार महिला गायब झाल्याची माहिती सरकारने विधानसभेत दिली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. हे सांगताना सरकारची जीभ का जड झाली नाही अशी विचारणा करत राज्यात चाललयं काय? असा सवाल त्यांनी विचारला आहे. राज्यातील २५ हजार महिला गायब झाल्याची माहिती सरकारनं विधानसभेत दिली आहे. पण हे सांगताना सरकारची जीभ का जड झाली नाही. २५ हजार महिला गायब कशा काय होऊ शकतात? तस्करी झालीय का..? माता भगिनींचं रक्षण करू न शकणारं सरकार आणि कसाई यांच्यात फरक काय?,” असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

एसटीच्या संपातील निलंबित
चालकाचा हृदयविकाराने मृत्यू

एसटीच्या संपात सहभागी झाल्याने निलंबित करण्‍यात आलेले राजापूर आगारातील चालक आणि वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे राकेश रमेश बांते (३५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली. गेले काही दिवस राज्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून संप मागे घेऊन कामावर हजर व्हा, असे सातत्याने आवाहन शासनाकडून होत आहे. हजर न झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु आहे.

करुणा मुंडे यांनी केली पक्ष
स्थापन करण्याची घोषणा

काही महिन्यांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करून चर्चेत राहिलेल्या करुणा मुंडे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आज अहमदनगरमध्ये सभा घेतली. शिवशक्ती सेना असं त्यांच्या पक्षाचं नाव असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलंय. एक वर्षांपासून मी जीवन ज्योती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केलेले आहे.

जामनेर तालुक्यात कार नाल्यात
उलटली, तीन जण जागीच ठार

जामनेर तालुक्यातील टाकळी गावाजवळ नागदेवता मंदिर भागात भरधाव मालमोटारीने कट मारल्याने कार नाल्यात उलटली. त्यात कारमधील तीन जण जागीच ठार झाले, तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. त्यात सहा महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

लुधियाना कोर्टामध्ये भीषण
स्फोट, दोन जण ठार

पंजाबच्या लुधियाना कोर्टामध्ये भीषण स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार दुपारच्या सुमारास घडला आहे. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला असून त्यामध्ये दोन जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्यामुळे न्यायालयात स्फोट झालेल्या ठिकाणच्या भितींना तडे गेले, तर बाडूच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. स्फोट कशामुळे झाला, अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही.

आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा
हल्ला, पायात खिळे ठोकले

आरटीआय कार्यकर्ते अमराराम गोदारा यांनी दोन दिवसांपूर्वीच दारू माफियांविरोधात तक्रार केली होती.
यामुळे संतापलेल्या दारु माफियांनी अमराराम गोदारा यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. पश्चिम राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील गिडा पोलीस स्टेशन परिसरात, अमरराम यांचं अपहरण करून त्यांना जबर मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांनी निर्दयतेच्या सर्व सीमा पार केल्या. हल्लेखोरांनी अमराराम यांच्या पायात खिळे ठोकले, त्यानंतर त्यांचे हातपाय तोडून गावाजवळील रस्त्याच्या कडेला फेकून दिले.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.