लष्कर, हवाई दल किंवा नौदलामध्ये रुजू होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक सुवर्णसंधी आली आहे. सैन्य दलांमध्ये 400 रिक्त पदांची भरती होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) यासंदर्भात अधिसूचना जारी करून एनडीए परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 10 एप्रिल 2022 रोजी एनडीएची परीक्षा होणार आहे.
युपीएससीने राष्ट्रीय संरक्षण अकादमी / नौदल अकादमी NDA / NDA I 2022 साठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर आता सर्व पात्र उमेदवारांसाठी (पुरुष आणि महिला दोन्ही) अर्ज जमा कार्यासंबंधी विंडो देखील उघडण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात किंवा खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकचा वापर करू शकतात.
रिक्त पदांचा तपशील
लष्कर (एनडीए) – 208 पदे (10 महिला)
नौदल – 42 पदे (3 महिला)
हवाई दल – 120 पदे
NA – 30 (केवळ पुरुष)
UPSC NDA/NA I 2022 अधिसूचना: अर्ज कसा करावा
अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या.
मुख्यपृष्ठावर प्रदर्शित झालेल्या NDA/NA सूचनेवर क्लिक करा.
आता नवीन पृष्ठावर आपला तपशील नोंदवून नोंदणी करा.
आता तुमच्या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने लॉग इन करा.
विनंती करण्यात आलेली आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
शुल्क (फी) भरा आणि अर्ज सबमिट करा.
अधिकृत अधिसूचनेमध्ये 400 रिक्त पदांची जाहिरात करण्यात आली आहे. यासंबंधी परीक्षा सुरू होण्याच्या जवळपास 3 आठवडे आधी उमेदवारांना एक ई-प्रवेशपत्रदेखील जारी केले जाणार आहे. या भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग असेल. 900 गुणांसाठी गणित आणि सामान्य अभियोग्यता या विषयांची परीक्षा असेल. UPSC NDA I 2022 परीक्षेची तारीख 10 एप्रिल 2022 ही निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2022 आहे. जे उमेदवार संरक्षण दलामध्ये आपले करिअर करून देशसेवा करण्याच्या तयारीत आहेत, त्या उमेदवारांना ही परीक्षा देऊन संरक्षण दलामध्ये एंट्री मिळवता येणार आहे.