कोरोनाचे संकट वाढत असताना आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. पुणे सारख्या शहरांमध्ये हे प्रमाण अधिक वाढलेले आहे. पालकमंत्री या नात्याने लोकप्रतिनिधींची एक बैठक शुक्रवारी बोलावलेली आहे. त्यामध्ये सर्वसंमतीने निर्णय घेतला जाईल. लॉक डाउन बाबत मतभिन्नता असली तरीसुद्धा नियमांचे पालन करावे लागणार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
त्यामुळे पक्षीय राजकारण मधे न आणता हे आपल्या सर्वांवरचं संकट आहे या भावनेने आपण कोरोनाशी लढलं पाहिजे. आम्ही ४५ वर्षापुढील सर्वांचं लसीकरण करण्याची मागणी केली होती ती मान्य झाली आहे त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार. पण आता ४५ च्या आतील अनेकांना कोरोना होत आहे. देवगिरी जिथे मी राहतो तिथे अनेक कर्मचारी वास्तव्यास आहेत. काल सगळ्यांची तपासणी केली तर नऊ लोक पॉझिटिव्ह होते. आपल्याला कोरोनाचा मुकाबला करावाच लागणार आहे. त्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून आर्थिक मदत कम कमी पडू न देण्याची भूमिका आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
“परमबीर सिंह यांच्यासंबंधी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून हायकोर्टातही तारीख आहे. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असल्याने त्यांनी सर्वाची मतं जाणून घेतली. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची भूमिकाही जाणून घेतली आहे. मंत्रिमंडळ उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे असा विश्वास सर्वांनी दिला आहे. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आपल्याला चौकशीत भेदभाव करण्याची गरज नाही. एटीएसनेही चांगला तपास केला होता. जे सत्य आहे ते राज्यातील जनतेसमोर येईल. अजून कोणची चौकशी करण्याची गरज असेल तर त्यासंदर्भात राज्य सरकार, राज्याचे प्रमुख भूमिका घेतील. भाजपाने केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
संजय राऊत यांनी शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करण्यासंबंधी केलेल्या विधानावर बोलताना ते म्हणाले की, “मी कधीही केंद्राशी संबंधित प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत. मी राज्य सरकारमध्ये आणि महाराष्ट्रात काम करणारा कार्यकर्ता आहे. मी राज्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. असे प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा आमचे सर्वोच्च नेते शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे पक्षाची भूमिका स्पष्ट करत असतात.