पाकिस्तानची पुन्हा तीच गत करू : सेनाप्रमुख मनोज नरवणे

भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेलं 1971 चं युद्ध कोणताही भारतीय कधीच विसरू शकणार नाही. त्या युद्धात झालेला दारुण पराभव पाकिस्तानही कधीच विसरू शकणार नाही. 1971च्या युद्धानं भारताचा इतिहास बदलून दाखवला. आणि पाकिस्तानचे टुकडे झाले. नवा बांगलादेश उदयाला आला. म्हणून या युद्धाला भारताच्या इतिहासात खास महत्व आहे. या युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सेनाप्रमुख मनोज नरवणे यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.

भारत पाकिस्तान युद्धावर बोलताना लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी पाकिस्तानला कडकडीत इशारा दिला आहे. मी कुणाशी भांडत नाही. पण युद्ध झाल्यास 1971 सारखी पाकिस्तानची गत तिन्ही सेना मिळून करतील, असं लष्करप्रमुख नरवणे म्हणाले आहेत. 1971 च्या युद्धावेळी मनोज नरवणेंचे वडील दिल्लीत तैनात होते. मनोज नरवणे केवळ 11 वर्षांचे होते. तेव्हा कधी लष्करप्रमुख होईल असा विचारही केला नव्हता, असंही ते म्हणालेत.

लष्करप्रमुख मनोज नरवणे मराठमोळे आहेत. त्यांच्या लष्करप्रमुख होण्याने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. 1971 च्या युद्धाला 9 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मनोज नरवणे लष्करात भरती झाले. त्यावेळी त्यांना दिलेल्या एका पुस्तकाच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या आहेत. त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानात 1971 च्या युद्धाची माहिती होती. भारतीय सेनेने त्यावेळी तयारीवर खूप चांगला भर दिला होता, त्यामुळेच 1971 च्या युद्धात पाकिस्तानला नमवून एवढा मोठा विजय प्राप्त करणे शक्य झाले. आता युद्ध कसोटी सामन्यासाारखं नाही तर टी-20 सामन्यासारखं झालं आहे. आता तयारीला एवढा वेळ मिळणार नाही, असंही ते म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.