भारतीय हवाई दलाकडून सामान्य प्रवेश परीक्षा साठी 317 जागांवर भरती

भारतीय हवाई दलाकडून सामान्य प्रवेश परीक्षा साठी 317 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. इंडियन एअर फोर्सनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. सामान्य प्रवेश परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरु होणार आहे.

भारतीय हवाई दलाच्या नोटिफिकेशननुसार कमिशन्ड ऑफिसर या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवार भारतीय हवाई दलाच्या https://careerindianariforce.cdac.in/ किंवा https://afcat.cdac.in या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. अर्ज सादर करण्याची मुदत 30 डिसेंबरपर्यंत आहे. भारतीय हवाई दलाच्या वेबसाईटवर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करु शकतात. इंडियन एअरफोर्सच्या माहितीनुसार एकूण कमिशन्ड ऑफिसर पदाच्या 317 पदांवर भरती होणार आहे. यामध्ये अफकॅट एन्ट्रीद्वारे फ्लायिंग साठी 77 जागा, ग्राऊंड ड्यटीच्या 129, ग्राऊंड ड्युटी नॉन टेक्निकल पदासाठी 111 पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

इंडियन एअर फोर्समध्ये फ्लाईंग पदासाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असावेत. मात्र, बारावीला विज्ञान शाखेतून गणित आणि भौतिकशास्ज्ञ विषयासह 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले असावेत. ग्राऊंड ड्यटी टेक्निकल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 50 टक्के गुणांसह फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषयासह 12 वी उत्तीर्ण असावा. तर, ग्राऊंड ड्युटी नॉन टेक्निकल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. अर्ज करण्यपूर्वी उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन पाहणं आवश्यक आहे.

इंडियन एअर फोर्स सामान्य प्रवेश परीक्षा फ्लाईंग ब्रांच अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 199 ते जानेवारी 2003 दरम्यान झालेला असावा. तर ग्राऊंड ड्युटीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 1997 ते 1 जानेवारी 2003 दरम्यान झालेला असावा. AFCAT एन्ट्रीसाठी 250 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.