सरकारकडून अजूनही शेतकऱ्यांची फसवणूक : राकेश टिकैत

वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसमोर गुडघे टेकत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागत तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. पण सरकार अजूनही शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप शेतकरी नेते राकेश टिकैत याांनी केला आहे. सरकारचा उद्देश साफ नाही, सरकार शेतकऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे.

पालघरमधील आदीवासींच्या जमीनी बळकावण्याचं काम सुरू असल्याचा, जंगले कापली जात असल्याचा आरोपही राकेश टिकैत यांनी केला आहे. सरकार अजूनही शेतकऱ्यांना वेगवेगळी नाव देत आहे. आधी पंजाबींना खालीस्तानी म्हणाले, हरयाणातील शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाले, पण आपण रागाला न जाता एकजुटीनं रहा असं आवाहनही राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. जे दिल्लीला आले नाहीत मात्र या आंदोलनाचं समर्थन करतात त्या शेतकऱ्यांचंही हे आंदोलन आहे. इथे प्रत्येक भाषा बोलणारा शेतकरी आहे, एक वर्ष अतिशय कठीन काळ होता असंही टिकैत म्हणालेत. आझाद मैदान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक जागा आहे.

महाराष्ट्रतील बरेच दिवस चाललेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आदोलनावरही राकेश टीकैत यांनी भाष्य केलं आहे. एसटी संदर्भात खासगीकरण न करता आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाविकासआघाडी सरकारनं मदत करण्याचं राकेश टिकैत यांनी आवाहन केलं आहे.

या आंदोलनात शहिद झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना 1 कोटींची मत करावी अशी मागणी राकेश टिकैत यांनी केली आहे. या आंदोलनाच्या यशाचं श्रेय जे या आंदोलनात शहिद झाले त्या शेतकऱ्यांचं आहे, असंही ते म्हणाले. आंदोलकेंद्र सरकारवर मात्र त्यांनी टीकेची झोड उडवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.