सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन, सरकारची कोंडी करण्याची तयारी

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक तास आधी सोमवारी संसदेत बैठक घेण्याचे नियोजन विरोधी पक्षनेत्यांनी केले आहे. या बैठकीत कृषीविषयक तीन कायदे आणि वाढती महागाई व इतर ज्वलंत प्रश्नांवर केंद्र सरकारचे अपयश अधोरेखित करण्यासाठी दोन्ही सभागृहात रणनीती निश्चित केली जाणार आहे.

29 नोव्हेंबरला सुरू होणारे हिवाळी अधिवेशन, संसदेच्या कामकाजापेक्षा राजकीय चर्चांमुळे जास्त तापेण्याची शक्याता आहे. आगामी पाच राज्यांच्या निवडणुका पाहता सरकार आणि विरोधक एकमेकांवर हल्ला-बोल करणार, हे नक्की.

काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने आणि खासदाराने सांगितले की, आमची रणनीती आहे की संसदेत संपूर्ण विरोधी पक्ष आणि समविचारी पक्षांच्या वतीने एकत्र सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. मतभेद नसावेत, कारण केंद्र सरकारच्या अपयशामुळे आजकाल सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

आणखी एक विरोधी पक्षनेते आणि राज्यसभा खासदार म्हणाले की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो, परंतु आम्ही विरोधी पक्षनेते म्हणून कृषी कायदे रद्द करण्यासाठी विधेयक 2021 वर चर्चा करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू. गेल्या वर्षभरात आंदोलक शेतकऱ्यांना काय सहन करावे लागले आणि सरकार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कशी सुधारू शकते यावर भर देऊ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.