निवडणुकीतून गिरीश महाजन यांनी पळ काढला : एकनाथ खडसे

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासमोर दणदणीत विजय मिळवला. याद्वारे खडसे यांच्या पॅनेलने जळगावच्या सहाकरावर आपले वर्चस्व कायम ठेवले. गिरीश महाजन यांना निवडणूक लढवण्याची हिंमत नव्हती म्हणून त्यांनी पळ काढला, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं. तसंच आता जिल्हा बँकेवर ताबा मिळालाय, भविष्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदही काबीज करू, असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय पाहायला मिळाला. 21 जागांपैकी 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, 7 जागांवर शिवसेना, 2 जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झालाय. तर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडे यांचाही एकतर्फी विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आनंद व्यक्त केला. तसंच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर खडसे यांनी जोरदार टीका केली.

या विजयाबद्दल बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, मागील सहा वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक क वर्गात होती. आता ती अ व्रगात आली. बँकेचा संचित तोटा आम्ही कमी केला. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न केला. त्याचे फलित म्हणून निवडणुकीत विजय झाला. गिरीश महाजन यांच्यात निवडणूक लढवण्याची हिंमत नव्हती. म्हणून त्यांनी पळ काढला. कदाचित अपयश येईल, याची जाणीव त्यांना झाली होती, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

पूर्वीचे भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मनातील खंतही व्यक्त केली. मागील 40 वर्षे मी भाजप रुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र चाळीस वर्ष माझी अवहेलनाच केली गेली. आता मात्र जिल्हा बँकेवर विजय मिळवून दाखला. भविष्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतदेखील विजय मिळवणार असल्याचा आत्मविश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.