पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

आज पुन्हा एकदा अंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅलर 82 डॉलरपर्यंत खाली आल्याने, पेट्रोल, डिझेलच्या किमती काही प्रमाणात कमी होऊन दिलासा मिळू शकतो. अमेरिकेमध्ये कच्च्या तेलाची क्रूड इन्व्हेंटरी वाढल्याने, कच्च्या तेलाचे दर घसरल्याचे पहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट झाली असताना देखील भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत. त्यामध्ये कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. ‘एचपीसीएल’ने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 104.01 आहे. तर डीझेलचा दर 86.71 रुपये प्रति लिटर एवढा आहे.

पेट्रोल -डिझेलचे भाव हे अंतराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाची किंमत आणि रुपयांच्या मुल्यावर अवलंबून असते. अंतराष्ट्रीय बाजारामध्ये जर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आणि रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेमध्ये वाढले तर भारतामध्ये पेट्रोल,डिझेल स्वस्त होते. या उलट जर कच्च्या तेलाचे दर वाढले आणि डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला तर इंधनाच्या किंमती वाढतात.

अमेरिकेमध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये तेजी दिसून येत आहे. कच्च्या तेलाचे उत्पादन दहा लाख बॅलरने वाढले आहे. त्यामुळे येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. कोरोना काळामध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट झाली होती. मात्र आता उत्पादन हे कोरोना पूर्व काळातील लेव्हलवर पोहोचल्याचे पहायला मिळत आहे. जर कच्च्या तेलाच्या किमती अशाच कमी होत राहिल्या तर भारतामध्ये देखील पेट्रोल, डिझेल स्वस्त होऊ शकते. दिवाळीदरम्यान पेट्रोल आणि डिझेलवरी उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याने, पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.