दिवाळीआधी एसटी कामगारांनी संप पुकारला होता. त्यामुळे दिवाळीला जाणाऱ्या चाकरमन्यांची धाकधूक वाढली होती. एसटी कामगारांनी जोरदार घोषणा देत संप पुकारला होता. त्यानंतर परिवहनमंत्री यांनी बैठक घेऊन कामगारांच्या मागण्या ऐकल्या. विविध मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कामगारांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे.
एसटी कामगार संघटना आणि परिवहन मंत्री यांच्यात बैठक झाली. अखेर या संपावर तोडगा निघाला आहे. एसटी कामगारांच्या मागण्या अखेर मान्य झाल्या आहेत. एसटी कामगारांना २८ टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याची मागणी परिवहनमंत्र्यांनी बैठकीत मान्य केली आहे.
कामगार संघटनेच्या मागण्या
• एस टी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं
• राज्य सरकारच्या कर्मचा-यांप्रमाणे दिवाळीपूर्वी 28 टक्के महागाई भक्ता मिळावा
• वाढीव घरभाडे भत्ता मिळावा
• सर्व सणांना उचल म्हणून 12,500 रुपये मिळावेत
• वार्षिक वेतन वाढ 2 टक्क्यांवरून 3 टक्के मिळावी
• कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेला नियमित वेतन मिळावे
• दिवाळी बोनस म्हणून 15,000 रुपये देण्यात यावेत
परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत कोणत्या मागण्या मान्य?
एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे मान्य करण्यात आलं आहे. त्यामुळे सहाजिकच 30 कोटी रूपयांचा भार दर महिन्याला एसटी महामंडळावर पडणार आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबतची कामगार संघटनांची बैठक संपली असून अखेर संप मागे घेण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे.
बेस्ट कामगार संघटनांसोबतची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली सह्याद्रीवरही बैठक झाली. या बैठकीमध्ये दिवाळी बोनससह कामगार संघटनांच्या इतर प्रलंबित मागण्यांवर बैठकीत झाली चर्चा झाली. उद्या पुन्हा एकदा कामगार संघटनांच्या नेत्यांसोबत चर्चा होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय जाहीर करणार आहेत.