आयटी कंपनी विप्रोचे फाउंडर अजीम प्रेमजी यांनी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एकूण 9713 कोटी रुपये म्हणजेच 27 कोटी रुपये प्रतिदिवस दान दिले आहे. यासोबतच भारतात सर्वात दानशुर व्यक्ती म्हणून अजीम प्रेमजी यांचे अव्वल स्थान कायम राहिले आहे.
एडेलगिव हुरून इंडिया फिलॅंथ्रोपी लिस्ट 2021 च्या अनुसार, कोरोना संसर्गा दरम्यान आजीम प्रेमजी यांनी लोकांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर दान दिले आहे. त्यानंतर HCL चे शिव नाडर (Shiv Nadar)दुसऱ्या स्थानावर होते, त्यांनी 1263 कोटी रुपयांचे दान दिले. तसेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे रिलायंन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी 577 कोटी रुपये दान देत यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कुमार मंगलम बिरला यांनी 377 कोटींचे दान देत या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.
देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती म्हणजेच प्रमुख गौतम अदानी कोटी संसर्गादरम्यान मदत म्हणून 130 कोटी रुपये दान दिले आहेत. दानशुरांच्या या यादीत ते आठव्या क्रमांकवर आहेत. याशिवाय इन्फोसिसचे को – फाउंडर नंदन निलेकणी यांनी देखील 183 कोटींचे दान केल्याने त्यांना या यादीत पाचव्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे.