भारतामध्ये नव्या व्हेरिएन्टचा धोका वाढला

कोरोनाचा आणखी एक धोकादाय़क व्हेरिएन्ट समोर आला आहे. इंग्लंड पाठोपाठ आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा नव्या व्हेरिएन्ट डेल्टापेक्षा जास्त धोकादायक असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये नवीन व्हेरिएन्टचे 7 रुग्ण आढळले आहेत. delta variant असताना जीनोम सिक्वन्सिंगमध्ये हे नवीन व्हेरिएन्ट आढळल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा अहवाल तातडीनं ष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (NCDC) पाठवण्यात आला असून त्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

21 ऑक्टोबर रोजी यूएस सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल यांनी दिलेल्या माहितीनुसार म्यूटेंट वायरस AY.4.2 व्हेरिएन्टचे मिळाले आहेत. पण असं असलं तरी दुर्लक्ष करून चालणार नाही. SARS-CoV-2 मधील INSACOG नेटवर्क मॉनिटरिंग व्हेरिएशनच्या शास्त्रज्ञांनी शनिवारी ही माहिती दिली.

AY.4.2 मुळे, UK, रशिया इथे पुढील आठवड्यात मॉस्कोमध्ये लॉकडाऊन केला जाण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे हा भयंकर वेगाने पसरणारा व्हेरिएन्ट आहे. त्यामुळे याचा अलर्ट जगभरातील देशांमध्ये देण्यात आला आहे. इस्रायलमध्ये मागच्या आठवड्यात या व्हेरिएन्टमुळे लॉकडाऊन करण्यात आला होता.या देशात कोरोना आणि नव्या व्हेरिएन्टचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.