भारतीय संघाचा प्रत्येक खेळाडू गुडघ्यावर बसला आहे. तसेच सामना सुरु होण्यापूर्वीदेखील सर्व खेळाडू सोबतच गुडघ्यावर बसल्याचे पाहायला मिळाले. हा प्रकार नेमका काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र भारतीय संघाने सध्या देशभर सुरु असलेल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर या चळवळीला समर्थन दिलं आहे. गेल्या वर्षी कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड यांची हत्या करण्यात आली होती. याच हत्येनंतर संपूर्ण जगभरात या चळवळीने जोर धरला आहे.
जगभरातून कृष्णवर्णीयांच्या हत्येचा निषेध केला जातोय. गुडघ्यावर बसून या चळवळीत सहभाग नोंदवला जातोय. गुडघ्यावर बसण्याला Taking the knee (टेकिंग द नी) असं म्हटल जात असून त्याला वर्षद्वेषाविरोधातील मोहिमेचं प्रतिक म्हटलं जातंय. भारतीय संघानेदेखील या चळवळीचे समर्थन केले आहे. याच कारणामुळे भारताचे खेळाडू गुडघ्यावर बसल्याचे पाहायला मिळाले.
पाकिस्तानचे खेळाडू गुडघ्यावर बसले नाहीत. पण त्यांनी हृदयाजवळ हात ठेवत ब्लॅक लाईव्ज मॅटर या चळवळीचे समर्थन केले आहे.