लसीकरणामध्ये नाशिक विभागाची राज्यात आघाडी

एकीकडे संपूर्ण देशात शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असताना, दुसरीकडे नाशिक विभागाने विभागाने राज्यात विक्रमी आघाडी घेत तब्बल 1 कोटी 29 लाख 34 हजार 893 नागरिकांचे लसीकरण केले आहे. नाशिक विभागाला पुरेसा लससाठा प्राप्त झाल्यामुळे हे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.

देशात 16 जानेवारी 2021 रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देणे सुरू झाले. प्रथम आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर व नंतर 1 मे 2021 पासून सर्व 18 वर्षावरील व्यक्तींना हे लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला जनतेचा मनातील संभ्रम व लसीची भीती यामुळे डोस घेण्याचे प्रमाण जरी कमी असले, तरी लस सुरक्षित व लाभदायक असल्याचे समजल्यामुळे हळूहळू कोरोना लसीकरण करून घेण्यासाठी रांगा लागत असल्याचे चित्र अनेक शहरात अनेकदा दिसून आले. लसीकरण करून घेणाऱ्यांचे प्रमाणदेखील जनजागृतीमुळे वाढत गेले. सर्वत्र लसीचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ लागले. आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने कोरोना लसीचे मोफत डोस घेण्याचे प्रमाण वाढत जाऊन या जागतिक कोरोना महामारीपासून संरक्षण करण्यात मोठे यश आले आहे.

नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांसाठी वेळोवेळी आज अखेर कोव्हॅक्सिन 15,99,370 डोसेस आणि कोविडशिल्ड 1,17,61,820 डोसेस शासनाकडून प्राप्त झाले आहेत. या दोन प्रकारच्या कोरोना लसीचे एकूण 1,33,61,190 डोसेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज अखेर विभागात 1, 29, 34, 893 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तांकडून देण्यात आली.

महाराष्ट्रात आजपर्यंत 9 कोटी 43 लाख 21 हजार लसीकरणाचे डोसेस दिलेले असून 18 वर्षे वरील वयोगटात 70% पहिला डोस व 29% दुसरा डोस पूर्ण केले आहेत, त्यात नाशिक विभागाचा विक्रमी वाटा आहे. नाशिक विभागात तब्बल 1,29,34,893 डोसेस देऊन कोरोना महामारीस संरक्षक ठरेल असे लसीकरण झाले आहे आणि यासाठी आरोग्य विभागास जनतेचा व लोकप्रतिनिधींचा सहभागामुळेच इतके लसीकरण पूर्ण करणे शक्य झाले आहे.पुढेही असाच चढता आलेख राहील, असा आरोग्य यंत्रणेस विश्वास आहे.

नाशिक जिल्ह्यात एकूण 45 लाख 12 हजार 691 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 32 लाख 90 हजार 262 जणांनी पहिला डोस घेतला असून 12 लाख 22 हजार 429 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात एकूण 32 लाख 52 हजार 514 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 24 लाख 10 हजार 016 जणांनी पहिला डोस घेतला असून 08 लाख 42 हजार 498 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 14 लाख 32 हजार 592 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 09 लाख 79 हजार 876 जणांनी पहिला डोस घेतला असून 04 लाख 52 हजार 716 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

जळगाव, नंदुरबार

जळगाव जिल्ह्यात एकूण 27 लाख 09 हजार 094 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 20 लाख 36 हजार 779 जणांनी पहिला डोस घेतला असून 06 लाख 72 हजार 315 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकूण 10 लाख 28 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 07 लाख 710 जणांनी पहिला डोस घेतला असून 03 लाख 27 हजार 292 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.