पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील हरनई भागात आज सकाळी भूकंपाचे (Pakistan Earthquake) तीव्र धक्के जाणवले. पाकिस्तानी माध्यमांनुसार, आतापर्यंत या दुर्घटनेत किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 150 लोक जखमी झाले आहेत.
बलुचिस्तान प्रांतातील (Balochistan Provinces) क्वेटा जिल्ह्यातील हरनई भागात पहाटे 3.30 वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. नॅशनल तेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता 5.9 रिश्टर स्केलवर नोंदवली गेली होती. भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. याशिवाय आसपासच्या अनेक जिल्ह्यांमध्येही नुकसान झाले आहे.
बलुचिस्तानच्या प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रमुखाने एएफपीला सांगितले की, आतापर्यंत 15 ते 20 लोकांचा बळी गेला आहे आणि मृतांचा आकडा वाढू शकतो. अपघातानंतर मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. जखमींना बलुचिस्तान प्रांतातील (Balochistan Provinces) हरनई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स (थर) आहेत, ज्या सतत फिरत असतात. जिथे या प्लेट्स अधिक टक्कर देतात, त्या झोनला फॉल्ट लाइन म्हणतात. वारंवार टक्कर झाल्यामुळे, प्लेट्सचे कोपरे वळवले जातात. जेव्हा जास्त दाब निर्माण होतो, प्लेट्स तुटतात आणि खाली असलेली ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते. मग या विघ्नानंतर भूकंप येतो.