इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वातील 49 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराजर्स हैद्राबाद (SRH vs KKR) या संघामध्ये खेळवला गेला. सामन्यात हैद्राबाद संघाला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला खरा पण या सामन्यात एक भारी गोष्ट हैद्राबाद संघासह भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने घडली आहे. हैद्राबाद संघातून टी नटराजनच्या जागी संघातून खेळणाऱ्या युवा गोलंदाज उम्रान मलिकने (Umran Malik) एक दमादर रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे.
उम्रान याने त्याच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर तब्बल 150 kmph वेगाने चेंडू फेकला. आय़पीएलच्या इतिहासात कोणत्याही भारतीय गोलंदाजाला इतका वेगवान चेंडू फेकता आला नाही. पण सलामीच्या सामन्यात पहिल्याच षटकात ही कमागिरी करत मलिकने त्याच्या एन्ट्रीचं बिगुलचं जणू वाजवलं आहे. त्याच षटकात मलिकने पहिला चेंडू 145 kmph, दुसरा चेंडू 142 kmph, तिसरा चेंडू 150 kmph, चौथा चेंडू 147 kmph, पाचवा चेंडू 143 kmph आणि सहावा तेंडू 142 kmph या वेगाने फेकत ओव्हरची समाप्ती केली. दरम्यान त्याच्या या कामगिरीनंतर सर्वत्र त्याच्याच नावाची चर्चा असून आयपीएलने त्यांच्या संकेतस्थळावर खास मलिकचा व्हिडीओही पोस्ट केला आहे.
आयपीएलमधील सर्वात वेगवान गोलंदाज (भारतीय)
उम्रान मलिक (सनरायजर्स हैद्राबाद) – 150.06kmph
मोहम्मद सिराज (आरसीबी) – 147.68kmph
मोहम्मद सिराज (आरसीबी) – 147.67kmph
खलिल अहमद (सनरायजर्स हैद्राबाद)- 147.38kmph
उम्रान मलिक (सनरायजर्स हैद्राबाद) – 146.84kmph
सनरायजर्स हैद्राबाद संघाचा (SRH) खेळाडू आणि भारताचा गोलंदाजा टी नटराजन (T Natrajan Corona Positive) याला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे उम्रान मलिक याला टी नटराजनच्या जागी संघात घेण्यात आलं. उम्रान हा जम्मू आणि काश्मीर संघातील खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत एक टी20 आणि लिस्ट A सामने खेळले असून त्यामध्ये 4 विकेट्स घेतले आहेत. तो सध्या सनरायजर्स हैद्राबाद संघाचा नेट बोलर म्हणून खेळत असताना आता त्याला संघातही स्थान मिळालं आहे.