लसीच्या प्रमाणपत्रात जन्मतारीखही नोंद करता येणार

भारतीय नागरिकांनी यापुढे जर आंतरराष्ट्रीय प्रवासाचे प्रमाणपत्र डाउनलोड करायचे असेल, ते नागरिक आता CoWin द्वारे डाऊनलोड केलेल्या लसीच्या प्रमाणपत्रात त्यांची जन्मतारीखही नोंदवू शकणार आहेत. सध्या भारत सरकारकडून ऑनलाईन जे प्रमाणपत्र जारी केले जात आहे, त्यावर नागरिकांच्या जन्मतारखेचा उल्लेख केला जात नाही. संबंधित नागरिकाच्या वयाचा उल्लेख असतो. आता या प्रमाणपत्रावर जन्मतारीखही नोंदवता येणार असल्यामुळे याचा परदेशात जाऊ इचछीणाऱ्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवासाचे प्रमाणपत्र डाउनलोड करताना मोठा फायदा होणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) मार्गदर्शक तत्त्वांनुसार जन्मतारीख हा डिजिटल लसीकरण प्रमाणपत्राचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. CoWin प्रमाणपत्र आता WHO चे DDCC: VS मानके पूर्ण करते, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, हा बदल आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना जगभरातील त्यांच्या लसीकरणाची स्थिती प्रमाणित करण्यास मदत करणारा आहे. हे प्रमाणपत्र आता प्रवाशांना इंग्लंडमध्ये क्वारंटाईनचा कालावधी टाळण्यास मदत करेल की नाही हे पाहणे मात्र बाकी आहे. तिथे कोविशिल्डला वैध आणि सक्रियपणे काम करणारी लस म्हणून ओळखले जाते. परंतु लसीकरण केल्यानंतर दहा दिवस क्वारंटाईन राहणे तिथे बंधनकारक आहे.

लसीच्या प्रमाणपत्रांसाठी नेमके निकष काय आहेत?

डब्ल्यूएचओने एक दस्तऐवज जारी केला आहे, त्यानुसार देशाच्या कोविड प्रमाणपत्रामध्ये सर्व घटकांचा समावेश करणे बंधनकारक आहे. जेणेकरून जागतिक स्तरावर त्या प्रमाणपत्राच्या माध्यमातूनही व्यक्तीची ओळख सिद्ध होईल.

डिजिटल डॉक्युमेंटेशन ऑफ कोविड सर्टिफिकेट : लसीकरण स्थिती (DDCC: VS) नावाच्या दस्तऐवजासाठी नाव, जन्मतारीख, ओळख क्रमांक, लिंग तसेच दोन्ही डोसचे तपशील आवश्यक आहेत.

भारताचे CoWin प्रमाणपत्र नागरिकांना त्यांच्या पासपोर्ट क्रमांकांसह त्यांचे प्रमाणपत्र अद्ययावत करण्याची परवानगी देते. परंतु या अद्यतनापूर्वी व्यक्तीची जन्मतारीख नोंदवली जात नव्हती. आता नव्या बदलामुळे भारताचे लस प्रमाणपत्र WHO च्या मानकांशी जुळणार आहे.

नवीन बदलामुळे इंग्लंडमधील अनिवार्य क्वारंटाईनच्या कालावधीमध्ये शिथिलता येईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.