गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या लोकांचे लक्ष लागून राहिलेल्या Flipkart Big Billion Days Sale च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. हा सेल 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार होता. मात्र, 3 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. अॅमेझॉनच्या ग्रेट इंडिया फेस्टिव्हलच्या एक दिवस आधी बिग बिलियन डेजची विक्री सुरू होईल. त्यामुळे या दोन्ही ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळेल. यामध्ये ग्राहकांच्या पदरात मोठा लाभ पडण्याची शक्यता आहे.
फ्लिपकार्टच्या या वार्षिक सेलमध्ये तुम्हाला Pixel 4a, Poco X3 Pro, Moto Edge 20 Fusion, Asus Rog Phone 3 आणि Infinix Hot 10s या स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळेल. याशिवाय, तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्डवर कॅशबॅकही मिळेल.
फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे की लाखो विक्रेत्यांसाठी टीबीबीडी (द बिग बिलियन डे सेल) महत्त्वाचा आहे, कारण कोरोनानंतर अनेकजण त्यांचा व्यवसाय पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहेतया सेलमुळे पुरवठा साखळीत मोठ्या प्रमाणावर रोजगारही निर्माण होतो. टीबीबीडी आता 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 10 ऑक्टोबरपर्यंत चालेल.
Poco ने X3 Pro हा स्मार्टफोन या वर्षाच्या सुरुवातीला 18,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च केला होता, परंतु फ्लिपकार्टने खुलासा केला आहे की, हा फोन 16,999 रुपयांना विकला जाईल. ही किंमत लॉन्च किमतीपेक्षा 2,000 रुपयांनी कमी आहे.
फ्लिपकार्टच्या टीझर पेजवरून समोर आले आहे की फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान मोटो एज फ्यूजन 20 हा फोन 19,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. मोटो एज फ्यूजन 20 च्या बेस व्हेरिएंटची लॉन्च प्राईस 21,499 रुपये आहे. फ्लिपकार्ट सेल दरम्यान 1,500 रुपयांची सवलत देण्यात आली आहे, यात तुम्हाला बँक डिस्काऊंट देखील मिळेल.
या सेलमध्ये, तुम्ही Asus ROG Phone 3 हा स्मार्टफोन 34,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. ROG फोन 3 च्या बेस व्हेरिएंटची लॉन्च किंमत 49,999 रुपये होती, पण भारतात ROG फोन 5 लाँच झाल्यानंतर कंपनीने या फोनची किंमत कमी केली आहे. यात तुम्हाला बँक डिस्काऊंट देखील मिळेल.
फ्लिपकार्ट 12,999 रुपये या किंमतीच्या तुलनेत Infinix Hot 10s 9,499 रुपयांना विकणार आहे. हा फोन या वर्षाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आला होता.
काही डिस्काऊंट्स अद्याप जाहीर करणे बाकी आहे. तथापि, फ्लिपकार्ट सेल दरम्यान Pixel 4a ची किंमत 20,000 ते 29,999 रुपयांच्या दरम्यान असेल, जी सध्याच्या 31,999 रुपयांच्या किंमतीपेक्षा कमी आहे. पिक्सेल 4 ए आधी 29,999 रुपयांना उपलब्ध होता, त्यामुळे यावेळी किंमत त्यापेक्षा किंचित कमी असू शकते.