वास्तुशास्राच्या अनुसार घरात कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे. मात्र घरात कासव ठेवताना कोणत्या दिशेला ठेवावे या बाबत उपयुक्त माहिती
हिंदू धर्मात घरात कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे. धार्मिक मान्यतानुसार प्रभू विष्णुंचा एक रुप कासव होता. विष्णूंनी कासवाचे रुप धारण करुन समुद्र मंथन दरम्यान मंद्रांचल पर्वत आपल्या कवचवर सांभाळले होते. जिथे कासव असतं तिथे लक्ष्मीचा वास असतो असे देखील म्हटलं जातं. फेंगशुईत देखील कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे. घरात आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा म्हणून कासव ठेवला जातो. परंतू त्याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा कासव योग्य दिशेत ठेवला असेल. नाहीतर अशुभ परिणाम हाती लागू शकतात.
कासव ठेवल्याने धन प्राप्ती होते. धनासंबंधी समस्या कासव ठेवल्याने दूर होते परंतू या साठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानले गेला आहे. तसेच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीघार्यु प्राप्त होते आणि आजारापासून मुक्तीदेखील मिळते.
कासव ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेत देखील यश हाती लागतं. कासव आपल्या कुटुंबाला वाईट नजरपासून देखील वाचवतं. याने घरात सुख-शांती नांदते.
नवीन व्यापार सुरु करताना दुकान किंवा ऑफिसमध्ये चांदीचा कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे. याने जीवनात ऊर्जेचा प्रवाह होता आणि स्थिरता राहते.
फेंगशुईनुसार ऑफिस किंवा घराच्या मागील भागात म्हणजे बैकयार्डमध्ये कासव ठेवल्याने अपार ऊर्जा जाणवते आणि आपले सर्व कार्य योग्य रित्या पार पडतात.
करिअरमध्ये उन्न्तीसाठी काळ्या रंगाचा कासव उत्तर दिशेत ठेवावा. ऊर्जा वाढल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची शक्यता वाढते.
घराच्या मुख्य दारात पश्चित दिशेकडे कासव ठेवल्याने सुरक्षा मिळते.
कासव गुड लकसाठी ठेवण्यात येतं म्हणून पाठीवर पिल्लं असलेल्या मादा कासव ठेवल्याने दंपत्तीला संतान सुख मिळतं.
क्रिस्टलने निर्मित कासव दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेत ठेवावा.
लाकडाने निर्मित कासव पूर्व किंवा दक्षिण-पूर्व दिशेत ठेवावा. कासव घरातील लिव्हिंग रुममध्ये ठेवल्याने घरातील सदस्यांचे आपसात प्रेम वाढतं.
मातीने निर्मित कासव उत्तर-पूर्व दिशा, मध्य किंवा दक्षिण-पश्चिम दिशेत ठेवावा.
धातू निर्मित कासव उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेत ठेवता येईल. तरी मिश्रित धातू निर्मित कासव उत्तर दिशेत ठेवणे योग्य राहील.
तसेच कासवाचे तोंड नेहमी पूर्वीकडे असावे. ही दिशा शुभ मानली गेली आहे.
कासव नेहमी पाण्यात ठेवावं. कासवाला धातूच्या भांड्यात पाणी भरुन ठेवावं ज्याने घरात सुख-समृद्धी, शांती नांदते.
तसचं धातू किंवा तांब्याचा कासव पोर्णिमेला खरेदी करुन आणावा. नंतर कच्च्या दुधात बुडवून ठेवावा. शुभ मुर्हुत बघून कासव दुधातून काढून स्वच्छ पाण्याने धुवावा. नंतर तांब्याच्या किंवा काचेच्या बाऊलमध्ये जरा पाणी भरुन त्यात कासव स्थापित करावा. यासाठी घरातील उत्तर-पूर्व कोपरा शुभ मानला गेला आहे.