व्होडाफोन-आयडियाला कर्जाची परतफेड करण्यासाठी वेळ देण्याचे आवाहन

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि इतर काही बँकांनी भारत सरकारला कर्जाची परतफेड करण्यासाठी व्होडाफोन आयडियाला अधिक वेळ देण्याचे आवाहन केले आहे. गेल्यावर्षी एका न्यायालयाने या टेलिकॉम कंपनीला त्याची थकबाकी लवकर भरण्याचे आदेश दिले होते. व्होडाफोन-आयडियावर सध्या 1.8 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्टेट बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि इंडियन बँक्स असोसिएशनचे प्रतिनिधी (आयबीए) या महिन्यात वित्त आणि दूरसंचार विभागातील अधिकाऱ्यांना भेटले. या दरम्यान, बँक अधिकाऱ्यांनी सरकारला प्रस्ताव दिला की व्होडाफोन-आयडियाला थकबाकी भरण्यासाठी त्वरित सवलत दिली जावी. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही या विषयावर बँकांशी चर्चा केली आहे, परंतु या प्रस्तावांवर अर्थ मंत्रालय तयार आहे की नाही हा मुद्दा आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा अर्थ मंत्रालय काय भूमिका घेणार, याकडे लागल्या आहेत.

कर्जाच्या बोझ्यामुळे डबघाईला आलेल्या आयडिया-व्होडाफोन कंपनीच्या ग्राहकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच कुमारमंगलम बिर्ला Vodafone Idea च्या नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन पदावरून पायउतार झाले होते. त्यामुळे ही कंपनी बंद पडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. या पार्श्वभूमीवर कंपनीचे सीईओ रविंदर टक्कर यांनी मध्यंतरी ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.
Vodafone Idea कडून ग्राहकांना उत्तम सेवा आणि चांगले पर्याय देणे सुरुच राहील. गेल्या वर्षभरात ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार मानले. आगामी काळात Vodafone Idea डिजिटल इंडियन आणि डिजिटल भारत या अभियानाच्यादृष्टीने सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञान आणि सेवा पुरवण्याचा प्रयत्न करेल, असे रविंदर टक्कर यांनी म्हटले. यावेळी रविंदर टक्कर यांनी कुमारमंगलम बिर्ला यांचा राजीनामा किंवा कंपनीच्या आर्थिक परिस्थितीबद्दल भाष्य केले नव्हते. मात्र, त्यांच्या एकंदर प्रतिपादनाचा सूर आश्वासक दिसला होता.

Vodafone-Idea लिमिटेड दिवाळखोरीत निघणार?
कुमारमंगलम बिर्ला यांच्या पत्रातील उल्लेखानुसार Vodafone-Idea लिमिटेड कंपनी डबघाईला आली आहे. आता कंपनीचा गाडा हाकणे अवघड असल्याचे बिर्ला यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला Vodafone-Idea लिमिटेडकडे 27 कोटी ग्राहक आहेत. त्यामुळेच या कंपनीची सूत्रे सरकार किंवा अन्य कोणाकडे सोपवून कारभार सुरु ठेवण्याचा विचार कुमार मंगलम बिर्ला यांनी बोलून दाखवला आहे.

व्होडाफोन आयडिया (Vi) ने आपल्या 27 कोटी वापरकर्त्यांना ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. हे फसवणूक करणारे नो युवर कस्टमर (KYC) च्या माध्यमातून वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहेत. सायबर फसवणुकीसंदर्भात एअरटेलने जारी केलेल्या अॅडवायजरीनंतर व्हीआय(Vi)चा इशारा आला आहे. एअरटेलच्या सर्व ग्राहकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात फसवणूक करणारे नवीन तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल वापरकर्त्यांना कसे शिकार बनवत आहेत हे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ विठ्ठलल यांनी सांगितले आहे. असाच एक प्रकार आता व्हीआय(Vi) सब्सक्राइबर्समध्येही दिसून येत आहे, जिथे व्होडाफोन आयडियाचे कर्मचारी बनून फसवणूक करणारे लोक त्यांचा वैयक्तिक डेटा लोकांकडून घेत आहेत आणि वापरकर्त्यांना धमकावत आहेत. यापासून सावध राहावे, असे कंपनीच्यावतीने ग्राहकांना सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.