रोनित रॉयची वेब सीरिज, ‘कँडी’ मध्ये रिचा चड्ढाने केलेल्या कामाचंही कौतुक होत आहे. टीव्हीचा सर्वात लोकप्रिय चेहरा असलेल्या रोनित रॉयने ‘जान तेरे नाम’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 1992 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट यशस्वी झाला आणि रोनित रॉयनं वर्चस्व गाजवलं. पण काही काळानंतर त्याला काम मिळणं बंद झालं, त्यानंतर तो अमिताभ बच्चन, आमिर खान, प्रीती झिंटा सारख्या कलाकारांचा बॉडीगार्ड बनला. रोनितने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, त्यांच्याकडे काम नाही, पैसे नाहीत, म्हणून त्याने प्रशिक्षण घेतले आणि स्टार्सचं संरक्षण करण्यास सुरुवात केली.
तो म्हणाला, ‘मी प्रिती झिंटा, आमिर खानचा अंगरक्षक होतो. त्यात माझं काय चुकलं? ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपल्या गीतेमध्येही हेच लिहिलं आहे, वेदातही लिहिलं आहे की, विषासारख्या वस्तू टाकून द्या. स्वाभिमान ही एक गोष्ट आहे, अहंकार दुसरी गोष्ट आहे. कोणतेही काम लहान नसतं.
तो पुढे म्हणाला, ‘माझ्याकडे पैसे नव्हते, माझ्याकडे काम नव्हतं. इस्रायलमधून एक टीम आली, मी त्यांच्याकडून जागतिक दर्जाचं प्रशिक्षण घेतलं आणि हा व्यवसाय सुरू केला. 10 वर्षांपासून मी संपूर्ण चित्रपट उद्योग एकट्याने हाताळला आहे आणि मी मैदानावर आहे. मग ते बच्चन साहब असो आमिर असो हृतिक असो किंवा प्रीती. त्याच्या पाठीशी उभे राहून त्याचे संरक्षण करणे ही माझ्यासाठी अभिमानाच होती.
रोनित रॉयने पुढे सांगितलं की, जेव्हा तो मुंबईला आला तेव्हा त्याच्याकडे फक्त 6 रुपये 20 पैसे होते. तो म्हणाला, ‘मी मुंबईला आलो तेव्हा माझ्या खिशात 6 रुपये 20 पैसे होते. तो ट्रेनमधून उतरताच पैसे खर्च झाले. मी नाश्ता केला आणि पैसे संपले.
‘कँडी’ एक मर्डर मिस्ट्री आहे जो एका डोंगराळ ठिकाणी चित्रित केला गेला आहे. या सिरीजमध्ये काम करण्याबाबत, रोनित रॉयने एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, या सिरीजमध्ये काम करून आपण भाग्यवान आहोत. तो म्हणाला की, पहिल्यांदाच तो इतकी मनोरंजक व्यक्तिरेखा साकारत आहे.