इंडोनेशियामध्ये भयंकर दुर्देवी घटना घडली आहे. देशातल्या बॅन्टेन प्रांतातील तुरुंगात भीषण आग लागली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या भीषण आगीत 40 कैद्यांचा मृत्यू झाला आहे.
कारागृह अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीच्या दुर्घटनेत 40 कैद्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदी भरले होते.आज पहाटे 1 किंवा 2 च्या सुमारास आग लागली. यावेळी जास्तकरुन कैदी झोपले होते. या आगीत अनेक कैदी गंभीर जखमी झालेत. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
कायदा आणि मानवाधिकार मंत्रालयाच्या कारागृह विभागाच्या प्रवक्त्या रिका अपरिंती यांनी सांगितलं की, आग तंगेरंग कारागृह ब्लॉक सी मध्ये लागली.जखमी झालेल्या कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान आग लागलेला ब्लॉक पूर्णपणे रिकामी करण्यात आला आहे. सद्यपरिस्थितीत आगीवर नियंत्रणात मिळवण्यात यश आलं आहे. मात्र आग लागल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पुढे त्यांनी सांगितलं, तुरुंगातील या ब्लॉकचा वापर कैद्यांना ड्रगशी संबंधित गुन्ह्यांसाठी ठेवण्यासाठी केला जातो. ब्लॉकमध्ये 122 कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे. मात्र सध्या किती जणांना ठेवण्यात आलं होतं. याची अजून स्पष्टता झाली नाही आहे.
सप्टेंबरच्या सरकारी आकडेवारीनुसार, तांगेरांग हे जकार्ताजवळ औद्योगिक आणि उत्पादन केंद्र आहे. येथील तुरुंहात दोन हजारांहूनअधिक कैदी होते. जे त्याच्या 600 लोकांच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त आहे.