अफगाणिस्तानमधील
भारतीयांची सुरक्षा आणि चिंता
अफगाणिस्तान संबंधीची भारताची मुख्य चिंता म्हणजे अफगाणिस्तानच्या कोणत्याही भूभागाचा दहशतवाद किंवा भारतविरोधी कारवायांसाठी वापरू नये याची दक्षता घेतली जाईल. तसेच दुसरी चिंता म्हणजे अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या संपूर्ण भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परत येण्याबाबतची आहे. या प्रश्रांसंदर्भात कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानच्या सांगण्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी दोहा येथील भारतीय दूतावासात कतारमधील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे उपप्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टँकझाई यांची भेट घेतली तेव्हा भारताने हा मुद्दा तालिबानांसोबत उपस्थित केला होता.
पुणेकरांनी गणेशोत्सवात आॕनलाईनच्या माध्यमातून आनंद घ्यावा; मंडळांचे पुणेकरांना आवाहन
कोरोनाच्या सावटामुळे मागील वर्षी गणेशोत्सव सर्वांनीच साधेपणाने साजरा केला होता.
तसेच नागरिकांना,भक्तांना ऑनलाईन माध्यमातून दर्शन व आरती घेण्याचे आवाहन केले होते.त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात कोरोनाचे सावट आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेऊन उत्सव साजरा करण्याचे आणि ऑनलाईन माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांचे अध्यक्ष व पदाधिका-यांनी केलं आहे.
१)मानाचा पहिला श्री कसबा गणपती
२)मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
३)मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती
४) मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती
५) मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि
- प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ या मंडळांनी एकत्रित येऊन पुणेकरांना आवाहन केले आहे.
यंदाही पुण्याच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे पुणेकरांच्या हितासाठी आणि प्रशासनाच्या सहाय्यासाठी पुण्याच्या मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाच्या वतीने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.पुणेकरांनी देखील स्वत:ची आणि इतरांची काळजी घेऊन गर्दी टाळावी, असेही मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी सांगितले.
१५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
दरम्यान सीईटी परीक्षा
तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर झाल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या यासाठीच्या सर्व सीईटी परीक्षा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी सांगितले
चांदिवाल आयोगाने परमबीर सिंह
यांच्याविरोधीत केले वॉरंट जारी
चांदीवाल आयोगारमोर गैरहजर राहणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधीत चांदिवाल आयोगाने वॉरंट जारी केले आहे. या वॉरंटमुळे परमबीर सिंह यांना आयोगापुढे हजर राहून जामीन मिळवावा लागणार आहे. वारंवार निर्देश देऊनही सिंह आयोगापुढे उपस्थितीत राह नसल्यामुळे आयोगाने हे कडक पाऊल उचलले आहे. परमबीर यांनी चांदिवाल आयोगाच्या चौकशीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
प्रत्येक भारतीय नागरिक
हिंदूच : मोहन भागवत
भारतात राहणा-या हिंदू आणि मुसलमानांचे – पूर्वज एकच होते. प्रत्येक भारतीय नागरिक हिंदूच आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. पुण्यातील ग्लोबल ट्रेटेजिक पॉलिसी फाउंडेशनच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरसंघचालक म्हणाले, समजदार मुस्लिम नेत्यांनी मूलतत्ववादी विचारांविरुद्ध दृढतेने उभे राहिले पाहिजे. हिंदू समाज कोणाशीच शत्रुत्व ठेवत नाही. अल्पसंख्याक समुदायाला कोणालाच घाबरण्याची गरज नाही.
मंदिरे बंद असली तरी
आरोग्य मंदिरे सुरू आहेत : मुख्यमंत्री
आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं मात्र सुरु आहेत. यासाठी जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. धार्मिक स्थळं उघडली पाहीजेत, हरकत नाही. आज आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे. आरोग्याची मंदिरं ही महत्त्वाची आहेत. मंदिरही उघडणार पण टप्पाटप्प्याने जाणार आहोत. आपण घोषणा देताना भारत माता की जय, वंदे मातरम देतो, द्यायला चांगल्या आहेत. आम्हीही त्या घोषणा दिलेल्या आहेत. तुम्ही युतीच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख केला. बसा एकत्र, काय पाहीजे कल्याण डोंबिवलीला. जे शक्य होईल ते देईल.”, अशा कानपिचक्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित भाजपा नेत्यांना दिल्या.
पुर्वी तुम्हीच सत्तेत होता
ईडी कारवाई कशाला करेल
पुर्वी तुम्हीच सत्तेत होता त्यामुळे तुम्ही काहीही केलं, कोणतीही भानगड केली, तरी तुमच्यावर ईडी कारवाई कशाला करेल, असा सवाल उपाध्ये यांनी केला. तसेच स्वतः सत्तेत असल्याने सगळं बिनदिक्कत, कोणत्याही भीतीशिवाय सुरू होतं. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. तुमच्यावर कारवाई होत आहे. यापुढे अशा भानगडी चालणार नाहीत,” असं केशव उपाध्ये म्हणाले.
कारागृहात अरुण गवळी
घेतोय पदवीचे शिक्षण
खून प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला गुंड अरुण गवळी महाराष्ट्रातील मुक्त विद्यापीठातून कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेत आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. कारागृह अधीक्षक अनूप कुमरे यांनी सांगितले की, गवळी याने नाशिकमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून २०१९ मध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली होती.
पाहणी करायला आलेल्या
खासदाराला लोकांनी पळवले
गोरखपूर जिल्ह्यातील बांसगाव विभागाचे भाजपचे खासदार कमलेश पासवान यांना सोमवारी ६ रोजी पूरग्रस्त भागामध्ये लोकांच्या निषेधाला सामोरे जावे लागले. कारण या भागात पुराचे पाणी ओसरल्यावर खासदारांच्या आगमनामुळे लोक संतापले. लोकांनी सांगितले की, जेव्हा पुराच्या पाण्यात हजारो लोक अडकले होते, तेव्हा खासदार बेपत्ता राहिले. त्यानंतर आता इकडे आले, त्यामुळे त्यांना पाहून गावकरी चिडले. तसेच परत जा आणि घोषणा देऊ लागले. संतप्त ग्रामस्थांनी खासदारांना पुढे जाऊ दिले नाही.
गणेशोत्सवाआधी सलमानची चाहत्यांना धमाकेदार भेट
बॉलिवूड दबंग सलमान खानच्या होम प्रोडक्शनखाली बनलेल्या बहुप्रतीक्षित ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ या चित्रपटाचं पोस्टर आज रिलीज करण्यात आलं आहे. पोस्टर खूपच इंटरेस्टिंग वाटत आहे. पोस्टरमध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहात आहेत. यावरून ही लढाई शेवटपर्यंत असणार हेच दिसून येत आहे.
अभिनेता सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला चाहत्यांकडून पसंतीची पावती मिळते. यावेळी सलमानने गणेशोत्सवानिमित्त चाहत्यांना ही खास भेट दिली आहे. सलमानने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज केलं आहे. तसेच याला कॅप्शन देत सलमानने म्हटलं आहे, ‘बुराई के अंत की शुरुवात, गणपती बाप्पा मोरया’ चाहते पोस्टर पाहून खूपच उत्सुक झाले आहेत.
SD social media
9850 60 3590