शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला 19 जुलै रोजी पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली. पॉर्नोग्राफीप्रकरणी शिल्पाच्या अडचणींमध्ये देखील मोठी वाढ झाली. कुंद्रा आणि शेट्टी कुटुंबाला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागत असताना शिल्पा आणि राज वेगळे होणार अशी चर्चा रंगत आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या रिपोर्टनुसार शिल्पाच्या जवळच्या व्यक्तीने कुंद्रा कुटुंबातील काही खासगी गोष्टींचा खुलासा केला आहे. शिवाय या व्यक्तीने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीचं लग्न तुटणार? असा इशारा देखील दिला आहे.
शिल्पाच्या जवळाच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ‘शिल्पाला काहीही कल्पना नव्हती की तिचा हिरो आणि मालमत्ता अवैध आहे. आता राज दिलेल्या कोणत्याचं वस्तूला हात लावण्याची देखील शिल्पाला इच्छा नाही.’ शिल्पा आता आत्मनिर्भर आहे. शिल्पा स्वतःचा आणि मुलाचां सांभाळ करू शकते.
एवढंच नाही तर ‘हंगामा 2’ आणि ‘निकम्मा’ चित्रपटानंतर शिल्पा अन्य चित्रपटांमध्ये देखील काम करताना दिसणार आहे. यासाठी तिने काही दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत संवाद देखील साधला आहे. रिपोर्टनुसार दिग्दर्शक अनुराग बासू आणि प्रियदर्शनने त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी शिल्पाला ऑफर देखील दिली आहे .
दरम्यान, राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा सोशल मीडियापासून दूर होती. शिवाय ती ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ च्या शुटिंगला देखील उपस्थित नव्हती. पण आता शिल्पा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तिने पुन्हा आयुष्य नव्याने आयुष्याला सुरूवात केली आहे.