सर्वांच्या सहकार्यानेच कठीण कालावधीमधून
वाटचाल करणं शक्य : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ला हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी करोना काळामध्येही राज्याचं अर्थचक्र सुरु राहण्यासंदर्भात करण्यात आलेल्या आणि औद्योगिक क्षेत्रातील भविष्याच्या वाटचालीसंदर्भात माहिती दिली. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी करोना कालावधीमध्ये महाराष्ट्राला संभाळण्याचं काम सर्वांनी मिळून केल्याचं सांगत आभार मानले. सर्वांच्या सहकार्यानेच कठीण कालावधीमधून आपल्याला वाटचाल करणं शक्य झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं.
देशभरातील १२ ते १७ वयोगटातील मुलांना मिळणार ऑक्टोबरपासून लस
देशातील कोरोना लसीकरण मोहिमेला आता आणखी वेग येणार आहे. कारण, देशातील १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना आता लवकरच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना लस देण्यात येणार आहे.या वयोगटातील देशात मुलांची संख्या १२ कोटींपर्यंत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांना ही लस दिली जाईल. डीसीजीआयकडून यासाठीची परवानगी मिळली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना झायडस कॅडिला ही लस देण्यात येणार आहे.
ईडीने सर्वोच्च न्यायालयात दिली चक्राऊन टाकणारी माहिती, अंडरग्राऊंड आहे त्यांचे कार्यालय
अंडरग्राऊंड ऑफिसचा वापर युनिटेकचे संस्थापक रमेश चंद्रा करत होते आणि त्या ऑफिसला पॅरोल किंवा जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांचे पुत्र संजय चंद्रा आणि अजय चंद्रा यांनी भेट दिल्याची माहिती ईडीने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.चंद्रा आणि युनिटेक लिमिटेडच्या विरोधात ईडीकडून मनी लाँडरिंगच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. तसेच संजय आणि अजय चंद्रा दोघंही न्यायालयीन कोठडीत आहेत. पण, तरीही ते तुरुंगाच्या आत राहून त्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत त्याचबरोबर मालमत्ता विकत असल्याचेही ईडीने म्हटले आहे.
करोनाच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये
६० कंपन्यांची गुंतवणूक
करोनाच्या संकट ओढावल्यानंतरच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये ६० कंपन्यांनी गुंतवणूक केली असून एकूण दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या कालावधीमध्ये राज्यात झाली असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ मध्ये बोलताना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्यासह उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये आज हा कार्यक्रम पार पडला
मंत्री नारायण राणे यांचा
आज नरमाईचा सूर
मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा करणारे केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचा आज नरमाईचा सूर पाहायला मिळाला. काल दिवसभराच्या कोर्टकचेरीनंतर नारायण राणे आज मीडियाला सामोरे गेले. राणे शिवसेनेवर तुटून पडतील, मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक हल्ला करत नवे बॉम्ब टाकतील असं सर्वांनाच वाटत होतं. पण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख ‘महाशय’ आणि शिवसेनेचा उल्लेख ‘विरोधी मित्रं’ केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
ब्लॅक फंगसच्या निदानासाठीचं
टेस्टिंग किट तयार
पश्चिम बंगालमधल्या शास्त्रज्ञांच्या एका गटाने म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसच्या निदानासाठीचं टेस्टिंग किट तयार केलं आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांना हा बुरशीजन्य आजार होत असल्याचं समोर आलं आहे. या आजाराचं निदान करणारं हे पहिलं भारतीय किट ठरणार आहे.
पुण्यात मेट्रो कारशेडमध्ये
गोळीबार, एक जण जखमी
पुण्यात मेट्रो कारशेडमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणावर मेट्रोचं काम सुरू आहे. दरम्यान कोथरूडमध्ये असलेल्या मेट्रो कारशेडमध्ये काम करणार्या कर्मचार्याला लष्करातील जवानांकडून प्रशिक्षणादरम्यान गोळी लागली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अजय कुमार (वय २४, रा.बिहार), असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
काबूल विमानतळावर पाण्याची
बाटली 3000 रुपयांना
अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारीची तारीख जसजशी जवळ येत आहे. तशी तिथे अडकलेल्या लोकांच्या चिंतेत वाढ होतं आहे. काबूल विमानतळावर गोंधळाचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसात महागाई उच्चांक गाठत असल्याचं चित्र आहे. खाण्यापिण्याचं वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडल्याचं चित्र आहे. काबुल एअरपोर्टवर पाण्याच्या एका बाटलीसाठी ४० डॉलर्स म्हणजेच ३ हजार रुपये मोजावे लागत आहेत. तर एक प्लेट राइससाठी १०० डॉलर्स म्हणजे जवळपास साडे सात हजार द्यावे लागत आहेत. विशेष म्हणजे विमानतळावर यासाठीचे पैसे डॉलर्समध्येच घेतले जात आहेत.
कोरोनाचे संकट गडद,
रुग्णांमध्ये 21 हजारांहून वाढ
भारतातील कोरोनाचे संकट पुन्हा एकदा गडद होऊ लागले आहे आणि गेल्या 2 दिवसात नवीन रुग्णांमध्ये 21 हजारांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोविड -19चे 46397 नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत, 25467 नवीन रुग्ण आले होते.
15 जिल्हा बँकांच्या निवडणुका
घेण्यास परवानगी
महाराष्ट्रातील 15 जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्यास परवानगी मिळाल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाने मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र त्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट कायम आहे. या बँकांच्या अंतिम मतदार याद्या 27 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मात्र मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर किमान एक महिन्याच्या कालावधीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रत्यक्ष निवडणुका होऊ शकणार आहेत.
अफगाणिस्तान सरकार
12 सदस्यांची परिषद चालवणार
अफगाणिस्तान तालिबान्यांच्या ताब्यात गेल्यानंतर सगळ्यांच्या मनात एकच विचार आहे की, आता येथील लोकांचं काय होणार? अफगाणिस्तानात कोणते नियम लावले जाणार आणि कोणते सरकार उभे रहाणार? कारण अफगाणिस्तानातील या परिस्थितीमुळे अनेक देशांच्या व्यापारावर त्याचा परिणाम झाला आहे. तालिबान्यांच्या येण्यामुळे भारताचे अफगाणिस्तानासोबत असलेले व्यवहार आणि व्यापारावर परिणाम झाला आहे.
कृषी क्षेत्रातील अभ्यासक
पद्मश्री निंबकर यांचे निधन
फलटणमधील प्रसिद्ध निंबकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिटय़ूटचे संस्थापक, जुन्या पिढीतील शेती, बियाणे आणि शेळींच्या नव्या संकर जाती यामधील संशोधक, पद्मश्री बनबिहारी विष्णू निंबकर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. फलटण येथील राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
SD social media
9850 60 3590