मंत्रिमंडळातील नवीन
सदस्यांची यादी जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांची यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यासहीत राज्यातील एकूण चार खासदारांना मंत्रीपद मिळालं आहे. तसेच आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे, ‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख पशुपती पारस, ‘अपना दला’च्या अनुप्रिया पटेल यांचाही मंत्रीमंडळामध्ये समावेश करुन घेण्यात आला आहे. हे सर्व मंत्री आज सायंकाळी मंत्रीपदाची शपथ घेतील.
‘ही‘ आहे ४३ मंत्र्यांच्या नावाची यादी
१. नारायण राणे
२. सर्बांनंद सोनोवोल
३. विरेंद्र कुमार
४. ज्योतिरादित्य शिंदे
५. रामचंद्र प्रसाद सिंग
६. अश्विनी वैष्णव
७. पशुपति कुमार पारस
८. किरण रिजाजू
९. राजकुमार सिंह
१०. हरदीप सिंग पुरी
११. मनसुख मंदाविया
१२. भूपेंद्र यादव
१३. पुरुषोत्तम रुपेला
१४. जी. किसन रेड्डी
१५. अनुराग सिंग ठाकूर
१६. पंकज चौधरी
१७. अनुप्रिया सिंग पटेल
१८. सत्यपाल सिंग बघेल
१९. राजीव चंद्रशेखर
२०. शोभा करांडलाजे
२१. भानूप्रताप सिंह वर्मा
२२. दर्शना विक्रम जरदोश
२३. मीनाक्षी लेखी
२४. अन्नपूर्णा देवी
२५. ए. नारायणस्वामी
२६. कौशल किशोर
२७. अजय भट्ट
२८. बी. एल. वर्मा
२९. अजय कुमार
३०. चौहान देवुसिंह
३१. भगवंत खुबा
३२. कपिल पाटील
३३. प्रतिमा भौमिक
३४. डॉ. सुभाष सरकार
३५. डॉ. भागवत कराड
३६. डॉ. राजकुमार सिंह
३७. डॉ. भारती पवार
३८. बिश्वेश्वर तुडू
३९. शंतनू ठाकूर
४०. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई
४१. जॉन बारला
४२. डॉ. एल. मुरुगन
४३. निसिथ प्रामाणिक
“बायको जात चोरते आणि नवरा
राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले”
दरम्यान रवी राणा यांना राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. रवी राणा यांच्या निमित्ताने रुपाली चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावरही निशाणा साधला आहे. बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले,” असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.
कामगिरीच्या आधारावर
तर मोदींना सुद्धा हटवले पाहिजे
मोदी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. यामध्ये कामगिरीच्या आधारावर मंत्र्यांना काढून नवीन नेत्यांना संधी दिली जाणार आहे. तर काही मंत्र्यांना पदोन्नती दिली जाईल. दरम्यान केंद्रातील आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्या समवेत अनेक बड्या नेत्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जर कामगिरीच्या आधारावर मंत्र्यांना डच्चू दिला जात असेल तर मोदींना सुद्धा हटवले पाहिजे, अशी मागणी काॅंग्रेसने केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. बुधवारी पहाटे त्यांचं निधन झालं .आज संध्याकाळी पाच वाजता मुंबईमध्ये दिलीप कुमारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चीनच्या एका अणुप्रकल्पातून गळती
चीनच्या एका अणुप्रकल्पातून एका आठवड्यापूर्वी गळती झाल्याची तक्रार समोर आली आहे. ही गोष्ट चीनने बाहेर उघड होऊ दिली नाही. वृत्त समजल्यानंतर सरकार चीनच्या गुआंगदोंग प्रांताच्या ताइशन शहरातील अणुऊर्जा प्रकल्पावर नजर ठेवून असल्याचे हाँगकाँगच्या एका नेत्याने सांगितले. ताइशन शहराची लोकसंख्या जवळपास १० लाख असून, येथील अणूऊर्जा प्रकल्प हाँगकाँगपासून १३५ किलोमीटर दूर आहे.
माजी मंत्री खडसे यांचे जावई
गिरीश चौधरींना ईडीने केली अटक
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरींना ईडीने अटक केली आहे. भोसला जमीन घोटळयाप्रकरणी ही अटक केली आहे. काल दिवसभर त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या अटकेमुळे खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहे. खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर ईडीची कारवाई अटळ असल्याचे बोलले जात होते. पण, आज ईडीने त्यांचे जावई गिरीश चौधरींना अटक केली. खडसे यांनाही ईडीने अगोदर समन्स दिला होता.
एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना
‘नियुक्ती दिरंगाई भत्ता’ सुरू करा
पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यानं स्वप्निलने आत्महत्या केली. त्यामुळे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्वप्निलसारखे बरेच विद्यार्थी राज्यात आहेत. ज्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांना ‘नियुक्ती दिरंगाई भत्ता’ सुरू करा, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी केली आहे.
केंद्रीय नोकर भरतीसाठी
आता सीईटी द्यावी लागणार
यापुढे केंद्रीय नोकर भरतीसाठी आता समान पात्रता परीक्षा अर्थात सीईटी द्यावी लागणार आहे. ही सीईटी पुढील वर्षाच्या प्रारंभी होणार आहे. तशी घोषणा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली आहे. त्यामुळे ही सीईटी देण्यासाठी आताच कामाला लागावे लागेल.
मंत्रिमंडळ विस्तारात दिंडोरीचे डॉ. भारती पवार
डॉ. भागवत कराड यांचे नावे निश्चित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातून कुणाचा समावेश होतो, याची उत्सुकता अनेकांना आहे. त्यात जवळपास दोन नावांची निश्चिती झाली होती. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. पण, आता दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे डॉ. भारती पवार व डॉ. भागवत कराड यांचे नावे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे
६ हजार १०० जागा भरल्या जाणार
स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात असलेल्या शाखांमध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. अप्रेंटिसशिपद्वारे तब्बल ६ हजार १०० जागा भरल्या जाणार आहेत. स्टेट बँकेत अॅप्रेंटिसशिपसाठी बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी sbi.co.in या वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज करण्याची प्रक्रिया ६ जुलैपासून सुरू झाली आहे. येत्या २६ जुलै पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
SD social media
9850 60 3590