2024 लोकसभा निवडणुकांसाठी
पंतप्रधानांची तयारी सुरू
२०२४ मधील लोकसभा निवडणुका
डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान मोदी यांनी उर्वरित दुसऱ्या कार्याकाळासाठी सर्व मंत्रालयांना कामकाजाचा अजेंडा निश्चित केला आहे. सर्व मंत्रालये आता पुढील तीन वर्षांपर्यंत पंतप्रधानांनी निश्चित केलेल्या अजेंड्यावर काम करणार आहेत.
१६ ऑगस्टपासून अकरावी ऑनलाइन
प्रवेश प्रक्रिया सुरु होणार
१६ ऑगस्टपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक अमरावती, नागपूर महानगर पालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेळ केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येतील. सीईटी परीक्षेपुर्वी अर्जाचा पहिला भाग आणि परीक्षेनंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.
स्वदेशी विक्रांत जहाजाची
पहिली सागरी यात्रा यशस्वी
स्वदेशी बनावटीच्या विमानवाहक ‘विक्रांत’ जहाजाने (IAC) आज आपली पहिली सागरी यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली. ४ ऑगस्ट २१ रोजी विक्रांत कोचीहून निघाले होते. नियोजन केल्याप्रमाणे या जहाजाने चाचणीत प्रगती केली आणि प्रणालीचे मापदंड समाधानकारक मिळाले. जहाज भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यापूर्वी सर्व उपकरणे आणि यंत्रणा यशस्वी पणे सिद्ध करण्यासाठी समुद्रातील त्याच्या चाचण्यांची मालिका सुरूच रहाणार आहे.
२१०० सालापर्यंत पृथ्वीच्या तापमानात
२ डिग्री सेल्सियसने वाढ होईल
जागतिक तापमान वाढीबाबत आयपीसीसी ने धोक्याची सूचना दिली आहे. २१०० सालापर्यंत पृथ्वीच्या तापमानात २ डिग्री सेल्सियसने वाढ होईल असं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच पुढच्या ७९ वर्षात हा बदल होणार आहे. त्यामुळे पृथ्वीवर राहणं कठीण होईल असा इशारा देण्यात आला आहे. आयपीसीसीमध्ये अहवाल तयार करण्यासाठी ६० देशातील २३४ वैज्ञानिकांचा समावेश होता. आयपीसीसीनं आपल्या सहाव्या अहवालाचा पहिला भाग जाहीर केला आहे.
देशातले राष्ट्रीय महामार्ग अमेरिकेतल्या
महामार्गाच्या दर्जाचे असतील
देशात अनेक ठिकाणी महामार्गांच्या अवस्थेच्या बाबतीत जनता कायमच नाराज असल्याचं चित्र असतं. मात्र, येत्या तीनच वर्षांमध्ये हे चित्र बदलणार असल्याचा विश्वास रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. पुढील तीन वर्षांत देशातले सर्व राष्ट्रीय महामार्ग हे अमेरिकेतल्या महामार्गांसारख्या दर्जाचे असतील, असं ते म्हणाले.
देशात 50 कोटी
नागरिकांना लसीकरण
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 50.86 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत 3,11,39,457 रुग्ण कोविडमुक्त झाले. सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.40%. गेल्या 24 तासांमध्ये 39,686 रुग्ण कोविड मुक्त. गेल्या 24 तासात भारतामध्ये 35,499 नवीन रुग्णांची नोंद. भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,02,188, उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्येच्या 1.26%, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी असून हा दर सध्या 2.35% आहे.
तिरंदाज प्रवीण जाधव याच्या
कुटुंबाला धमकी
टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय चमूतील तिरंदाज प्रवीण जाधव याच्या कुटुंबाला धमकी मिळाली आहे. त्याचे आई-वडिलांना गावात घर बनविण्याची इच्छा आहे. परंतु त्यांचे शेजारी घर बांधण्यास हरकत घेत असून, त्यांना धमक्या आहेत. घर बांधण्याची परवानगी मिळाली नाही, तर गाव सोडण्याची इच्छा त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.
हिंदू समाजाच्या चार मंदिरांची
बांगलादेश मध्ये तोडफोड
पाकिस्ताननंतर आता बांगलादेशात देखील तेथील अल्पसंख्याक हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे. बांगलादेशातील अतिरेक्यांनी अनेक घरांवर, दुकानांवर हल्ला केला. इतकेच नव्हे तर अल्पसंख्यांक हिंदू समाजाच्या चार मंदिरांचीही तोडफोड केली. ही घटना बांगलादेशच्या खुलना जिल्ह्यातील रुपा तालुक्याच्या शियाली गावातील आहे.
मुख्यमंत्र्यांनी लोकल प्रवासाचा
गुंता वाढवला : केशव उपाध्ये
जनतेचा दबाव आणि भारतीय जनता पार्टीचे आंदोलन यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांनी नियम आणि अटींचा गुंता करून सोपा प्रश्न अवघड करून ठेवला आहे आणि प्रत्यक्षात सामान्यांना सहजपणे लोकलप्रवास करता येणार नाही, अशी व्यवस्था करून ठेवली आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली.
पुण्याचे बिल्डर अविनाश भोसले
ईडीच्या रडारवर, 4 कोटींची जागा जप्त
मनी लाँडरिंग प्रकरणी अंमलबजावणी – संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मालकीच्या अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ४ कोटी रुपयांची जागा जप्त करण्यात आली आहे. याचप्रकरणी अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसलेसुद्धा ईडीच्या रडारवर आहे. मागील महिन्यात त्यांची पाच तास कसून चौकशी झाली होती. पुण्यातील एका सरकारी जमिनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केले आहे.
कॉमेडियन अतुल खत्री यांनी लसीचे
प्रमाणपत्र टी-शर्टवर केले प्रिंट
ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरा डोस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. स्टँडअप कॉमेडीयन अतूल खत्रींनी लसीचं प्रमाणपत्र टी शर्ट वर प्रिंट करून घेतले आहे. त्यामुळे त्यांचा हा टी शर्टचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा ठरला आहे.
पोटात लपवले
दीड कोटीचे सोने
पोटात कॅप्सुलमध्ये दीड कोटी सोन्याचे पेस्ट लपवून म्यानमारमधून इम्फाळला आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देशांतर्गत विमानाने प्रवास केल्यास कोणालाही संशय येणार नाही, अशी शक्यता गृहित धरून संशयित इम्फाळमधून विमानाने दिल्लीला पोहोचले. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर सीमाशुल्क विभागाची करडी नजर असल्याने संशयितांनी हा मार्ग निवडला.
SD social media
9850 60 3590