राशिभविष्य : या राशीच्या व्यक्तींना धनलाभाची शक्यता, जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

आज सोमवार दिनांक 9 ऑगस्ट 2021. श्रावण शुद्ध प्रतिपदा. आज श्री सांब सदाशिव पूजन व उपवास असतो. नव विवाहिता आज शंकराच्या पिंडीवर शिवामूठ वाहून सौभाग्य व्रत करतात. आजची शिवामूठ आहे तांदुळ. आज शंकराला 108 बेल पत्र वाहून दुधाचा अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय हा जप 108 वेळा करून शिवस्तुती म्हणावी.

आज चंद्र  कर्क व सिंह राशीत भ्रमण करीत आहे. शुक्र आज कन्या राशीत प्रवेश करेल .

मेष –

आज काहीशी संतती चिंता सतावू शकते. नवीन काही वाचन किंवा अभ्यास कराल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. शिव पूजन करून दिवस शांततेत घालवा.

वृषभ –

आज दिवस घरासाठी काही नवीन योजना करण्यात जाईल. हितशत्रू टिकणार नाहीत. आरोग्य चांगले राहील. उत्तरार्ध आनंदात  जाईल. दिवस चांगला आहे.

मिथुन –

भावंडांची जबाबदारी वाढेल. काही महत्त्वाचे निरोप अथवा संभाषण होईल. खर्च जरा जपून करा. घरासाठी काही नवीन खरेदी होईल. कार्यक्षेत्रात सर्व काही नेहमी प्रमाणे सुरू राहील. दिवस शुभ.

कर्क –

आज दुपारनंतर काही धनलाभ होण्याचे संकेत आहेत. तुमचे मनोबल उत्तम राहील. उत्तरार्ध जास्त शुभ असेल. मानसिक शांतता लाभेल. शिवाची उपासना करावी.

सिंह –

राशीतील मंगळ चंद्र दुपारनंतर शुभ आहेत. आर्थिक लाभ, कौटुंबिक सुख मिळेल. वाहने जपून चालवा. शंकराची आराधना करा. दिवस बरा जाईल.

कन्या –

राशीमध्ये आलेला शुक्र, व्ययस्थानातील चंद्र मंगळ आज बरेच वैचारिक मंथन करायला लावेल. आर्थिक बाजू सांभाळा. शत्रूवर मात करणार आहात. दिवस चांगला जाईल.

तुळ –

नोकरी असणार्‍यांना उत्तम दिवस. कामे मार्गी लागतील. लाभ होतील. आरोग्य सांभाळा. आर्थिक बाजू चांगली राहील. पण सौंदर्य प्रसाधन, कपडे यावर खर्च होईल. चारित्र्य जपा. दिवस चांगला आहे.

वृश्चिक –

तुमच्या मुळच्या जिद्दी स्वभाव आणि चिकाटीने काम करण्याच्या वृत्तीचा लोक फायदा घेतील. काही मित्रांपासून सावध रहा. केलेले काम चांगले फळ देईल. दिवस शुभ.

धनु –

दुपारनंतर दिवस हळूहळू अनुकूलता वाढवणारा आहे. मानसिक ताण कमी होईल. ईश्वरी उपासना करावी. काहींना महत्त्वाचा निरोप येईल. गृहसौख्य उत्तम राहील. दिवस चांगला आहे.

मकर –

आज दिवस  थोडा त्रासदायक ठरू शकतो. पण दुपारपर्यंत कामे उरकून घ्या. मुलांना हवा तसा वेळ द्याल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. आर्थिक बाजु चांगली राहील. दिवस मध्यम जाईल.

कुंभ –

आज तुम्ही अध्यात्मिक वाचन कराल. पूजेत मन रमेल. जोडीने शंकराची पूजा करावी. मौल्यवान वस्तू सांभाळा. आर्थिक स्थिती ठीक राहील. प्रकृतीकडे लक्ष देण्याचा काळ आहे. दिवस मध्यम जाईल .

मीन –

आज काही नवीन ओळखी व्यवसाय पूरक ठरतील. येणार्‍या काळात नोकरी व्यवसाय चांगला चालेल. आज जास्त दगदग न करता दिवस शांततेत घालवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.