कोरोनाची लाट उसळल्यानंतर नागपूर शहरात पहिल्यांदा काल कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेनं सुरु आहे. परंतु नागरिकांनी यामुळे हुरळून न जाता अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.
नागपुरात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर कोरोनाच्या पहिल्या लाटेत तसेच दुसऱ्या लाटेत नागपूर शहरात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. 6 आँगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत झालेल्या कोरोनाच्या चाचणीत एकही रुग्ण आढळून आला नाही. नागपूर शहरात 4 हजार 856 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. तसेच एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.
नागपुर जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 92 हजार 925 कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 10 हजार 117 रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. परंतु आज मात्र एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
नागपुर शहरात आज एकही कोरोना रुग्ण प़ॉझीटिव्ह आढळला नाही, ही नागपूरसाठी चांगली बातमी आहे. यासाठी डॉक्टर व आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी चांगले काम केले आहे. त्याप्रमाणे महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. (फोटो क्रेडिट गुगल)