हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार श्रावण महिना हा वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरुन या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. यावर्षी हा पवित्र श्रावण महिना 09 ऑगस्ट 2021 पासून सुरु होईल आणि 6 सप्टेंबर 2021 रोजी संपेल.
दुसरीकडे, जर आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार पाहिले तर जुलै महिना जवळजवळ संपला आहे आणि ऑगस्ट महिना सुरु होणार आहे. उपवास आणि उत्सवांच्या दृष्टिकोनातून ऑगस्ट महिना खूप महत्वाचा ठरणार आहे.
1 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान कामिका एकादशी ते हरतालिका आणि रक्षाबंधन असे मोठे उत्सव असतील.
यानंतर जन्माष्टमीचा सण ऑगस्टच्या शेवटी साजरा केला जाईल. म्हणजेच ऑगस्टचा संपूर्ण महिना व्रत आणि सण साजरे करण्यात जाईल. ऑगस्ट महिन्यात येणार्या सर्व उपवास आणि उत्सवांची यादी जाणून घ्या.
ऑगस्ट महिन्यातील व्रत आणि सण
04 ऑगस्ट 2021 : कामिका एकादशी
05 ऑगस्ट 2021 : प्रदोष व्रत
06 ऑगस्ट 2021 : मासिक शिवरात्रि
08 ऑगस्ट 2021 : श्रावण अमावस्या
11 ऑगस्ट 2021 : हरतालिका
12 ऑगस्ट 2021 : विनायक चतुर्थी
13 ऑगस्ट 2021 : नाग पंचमी
16 ऑगस्ट 2021 : पारसी नवीन वर्ष
18 ऑगस्ट 2021 : श्रावण पुत्रदा एकादशी
19 ऑगस्ट 2021 : मुहर्रम
20 ऑगस्ट 2021 : प्रदोष व्रत
21 ऑगस्ट 2021 : ओणम
22 ऑगस्ट 2021 : रक्षाबंधन, श्रावण पौर्णिमा
25 ऑगस्ट 2021 : संकष्टी चतुर्थी
30 ऑगस्ट 2021 : जन्माष्टमी