भारतीय महिला हॉकी संघांचा स्वप्नभंग; आॕलिम्पिकमध्ये कांस्यपद हुकलं

भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्य पदकाचं स्वप्न भंगलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघाला कांस्य पदकाची कमाई करण्यात यश मिळालं नाही. राणी रामपालच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ब्रिटन संघाने 4-3 ने पराभूत केलं. यासोबतच महिला हॉकीच्या इतिहासात ऑलिम्पिकमधीलं पहिलं वहिलं पदक पटकवण्याच्या आशाही धुळीला मिळाल्या.

मॅचमध्ये काय झालं…?

भारत आणि ग्रेट ब्रिटनमध्ये कांस्य पदकासाठी हा सामना पार पडला. सामन्याच्या पहिला मिनिटापासूनच दोन्ही संघांनी आक्रमक रुप धारण केलं होतं. पहिला क्वार्टर ग्रेट ब्रिटनने गाजवला.

परंतु या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं…

दूसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचे तीन गोल, 0-2 ने पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाची कमाल

ब्रिटनने दूसऱ्या क्वार्टरची शानदार सुरुआत केली. सामन्याच्या 16 व्या मिनटाला ब्रिटनने पहिला गोल केला. Ellie Rayer ने फील्ड गोल केला. त्यामुळे भारत 0-1 ने पिछाडी पडला. तर 24 व्या मिनिटाला पुन्हा एकदा ब्रिटनने दूसरा गोल केला आहे. Sarah Robertson ने रिवर्स शॉटद्वारे हा गोल केला.

ब्रिटनने दोन गोल केल्यानंतरही भारताची टीम जराही विचलित झाली नाही. गुरजीत कौरने टीम इंडियाचं सामन्यात पुनरागमन करुन दिलं. तिने लागोपाठ दोन गोल केले. गुरजीतने दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे केले. गुरजीतने 2 मिनिटांच्या आतमध्ये हे दोन्ही गोल केले. तिने पहिला गोल 25 व्या मिनिटाला केला तर दूसरा गोल 26 व्या मिनिटाला केला.

ब्रिटन भारतावर पूर्णपणे हावी झालेलं असताना भारताच्या महिला संघाने सामन्यात जोरदार पुनरागमन केलं. पहिल्या क्वार्टरनंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचा शानदार खेळ मिळाला. पहिल्यांदा गुरजीत कौरने 3 मिनिटांत 2 करुन भारताचं सामन्यात पुनरागमन करुन दिलं. लगोलग भारताने आणखी एक गोल केला. वंदना कटारियाने तिसरा गोल करुन सामन्यात चुरस आणली.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये ब्रिटनकडून 1 गोल, ब्रिटन भारतीय संघावर ‘हावी’

ब्रिटनने तिसऱ्या क्वार्टरची आक्रमक सुरुवात केली. पहिल्या दोन क्वार्टरसारखीच ब्रिटेनने या क्वार्टरची देखील आक्रमक सुरुवात केली. ब्रिटनने 32 व्या मिनिटाला गोल केला.

लागोपाठ ब्रिटनने तिसराही गोल केला. ब्रिटनकडून वेबने 35 व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला भारताशी बरोबरी करुन दिली. यानंतर भारतला पेनल्टी कॉर्नर मिळाला परंतु गुरजीत कौरला गोल करण्यात अपयश आलं.

तिसरा क्वार्टर बिनदिक्कतपणे ब्रिटनच्या नावावर राहिला. ब्रिटनने या क्वार्टरमध्ये एक गोल केला. या क्वार्टरमध्ये गोलकीपर सविता पुनियाने शानदार बचाव केले. ब्रिटनकडून डायरेक्ट शॉटचे प्रहार केले गेले परंतु सविता पुनियाने खूप सुंदर डिफेन्स केले. तिसऱ्या क्वार्टरनंतर दोन्ही संघांचा स्कोअर आहे 3-3 होता…

चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला ब्रिटनने चौथा गोल केला. या गोलसह ब्रिटनने 4-3 ने आघाडी मिळवली. सामन्याच्या उर्वरित काही मिनिटे अतिशय थरार पाहायला मिळाला. परंतु भारताला गोल करण्यात अपयश आलं. सरतेशेवटी ब्रिटनने भारताला 4-3 ने पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.