नोकियाचा सर्वसामांन्याना परवडेल असा स्वस्त आणि मस्त मोबाईल

नोकियाने ( Nokia)सर्वसामांन्याना परवडेल असा स्वस्त आणि मस्त मोबाईल (Nokia 110 4G) लॉन्च केला आहे. Jio Phone Next ला टक्कर देणारा हा मोबाईल असेल, असंही म्हटलं जात आहे. कंपनीने हा मोबाईल आता विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला आहे. यूझर्ससाठी या मोबाईलमध्ये HD Voice Call चा ऑप्शन देण्यात आलेला आहे. सोबतच यामध्ये 4G कनेक्टीव्हीटी आहे. मोबाईलच्या बाजूच्या भागात मोठ्या आकारचे बटणही देण्यात आले आहेत. या मोबाईलचे Specifications काय आहेत, हे जाणून घेऊयात.

Nokia 110 4G या मोबाईलमध्ये बॅक कॅमेरा, टॉर्च, इंटरनेट आणि वायरलेस FM सारखे भन्नाट फीचर्स आहेत. तसेच मोबाईलमध्ये MP3 प्लेअर आणि 3 in 1 स्पीकर आणि गेम्सही आहेत. या मोबाईलचा बॅटरी लाईफही दमदार आहे.

हा Nokia 110 4G मोबाईल ई-कॉमर्स वेबसाईटवरुन खरेदी करता येणार आहे. तसेच Nokia.com/Phones या अधिकृत वेबसाईटवरुनही मोबाईल बूक करता येईल. या मोबाईलची किंमत केवळ 2 हजार 799 रुपये इतकी आहे. हा मोबाईल Yellow, Black आणि Aqua या तीन रंगामध्ये उपलब्ध आहे.

या मोबाईलचा 1.8 इंचचा QQVGA डिस्पले आहे. मोबाईलमध्ये ड्युअल सीम कार्ड (Nano Sim Slot) आणि Micro USB पोर्टही आहे. मोबाईलची बॅटरी ही 1020mAh इतकी आहे. स्टॅंड बायवर हा मोबाईलची बॅटरी 12 दिवस पुरेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. मोबाईलमध्ये 48 MB इंटरनल स्टोरेज आहे. हा स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 32 जीबीपर्यंत वाढवता येईल. मोबाईलचा रॅम हा 128MB RAM इतका आहे. मोबाईलमध्ये Unisoc T107 CPU और Series 30+ ही ऑपरेटींग सिस्टम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.