डिजिटल वित्तीय सेवा कंपनी पेटीएमला बाजार नियामक सेबीकडून 16,600 कोटी रुपयांच्या प्रारंभिक सार्वजनिक अर्जासाठी (आयपीओ) मंजुरी मिळालीय. या प्रक्रियेशी संबंधित सूत्राने शुक्रवारी ही माहिती दिली. कंपनी या महिन्याच्या अखेरीस शेअर बाजारात येण्याची अपेक्षा आहे. आयपीओच्या आधी वेगाने सूचीबद्ध होण्यासाठी शेअर विक्री कमी करण्याचा विचार करीत आहे.
कंपनीकडून 1.78 लाख कोटी मूल्यांकनाची मागणी
“सेबीने पेटीएमचा आयपीओ मंजूर केला आहे,” असे सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. पेटीएम 1.47-1.78 लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनाची मागणी करीत आहे. अमेरिकास्थित मूल्यमापन तज्ञ अश्वथ दामोदरन यांनी कंपनीच्या सूचीबद्ध नसलेल्या शेअर्सचे मूल्य 2,950 रुपये प्रति शेअर केले.
जर पेटीएमचा आयपीओ यशस्वी झाला, तर तो आजपर्यंतचा देशातील सर्वात मोठा आयपीओ असेल. आतापर्यंत हा विक्रम कोल इंडियाच्या नावावर आहे, ज्याने 2010 मध्ये IPO द्वारे 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. पेटीएम आयपीओ करण्यासाठी ज्या बँकांना शॉर्टलिस्ट करण्यात आले, त्यात मॉर्गन स्टॅन्ले, सिटीग्रुप इंक यांचा समावेश आहे. JPMorgan Chase & Co समाविष्ट आहेत. त्यापैकी मॉर्गन स्टेनलीचा दावा सर्वात मजबूत आहे.
विजय शेखर यांचा हा व्यवसाय झपाट्याने वाढला
पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा गेल्या एक वर्षापासून महसूल वाढवण्यात आणि पेटीएमच्या सेवांवर कमाई करण्यात गुंतलेत. स्टार्टअपने आपला व्यवसाय डिजिटल पेमेंटच्या पलीकडे बँकिंग, क्रेडिट कार्ड, वित्तीय सेवा, संपत्ती व्यवस्थापन आणि डिजिटल वॉलेटमध्ये वाढवला. पेटीएमने फोनपे, गुगल पे, अॅमेझॉन पे आणि व्हॉट्सअॅप पे या आव्हानाचा यशस्वीपणे सामना केला. देशातील व्यापारी पेमेंटमध्ये त्याचा सर्वात मोठा बाजार हिस्सा आहे. कंपनीच्या अलीकडील ब्लॉग पोस्टनुसार, पेटीएमचे 20 दशलक्षाहून अधिक व्यापारी भागीदार आहेत आणि त्याचे वापरकर्ते दरमहा 1.4 अब्ज व्यवहार करतात. शर्मा यांनी अलीकडेच सांगितले की, या वर्षाचे पहिले तीन महिने पेटीएमसाठी सर्वोत्तम आहेत. कोविड 19 महामारीमुळे डिजिटल पेमेंटमध्ये लक्षणीय वाढ झाली.