टोकियो ऑलिंपिकमध्ये मीराबाई चानू
यांना बेटलिप्टिंगमध्ये पहिले सिल्व्हर मेडल
टोकियो ऑलिंपिकमध्ये मीराबाई चानू यांना बेटलिप्टिंगमध्ये पहिले सिल्व्हर मेडल मिळाले आहे. २१ वर्षानंतर भारताला बेटलिप्टिंगमध्ये हे मेडल ऑलिंपिकमध्ये मिळाले आहे. चानू यांच्या यशाबद्दल पंतप्रधान व राष्ट्रपदींनी अभिनंदन केले आहे. जपानची राजधानी टोकियो येथे काल सुरू झालेल्या ऑलिंपिकमध्ये यंदा भारतीय खेळाडूंचा मोठा चमू सामील झाला आहे. भारतातून प्रथमच ११९ इतका मोठा खेळाडूंचा गट या जागतिक स्पर्धेत उतरला आहे. चानू यांचे यश देशाला उत्साहित करणारे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन सांगितले आहे.
आयसीएसई दहावी, आयएससी
बारावीचा निकाल ९९ टक्के
आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल ९९.९८ टक्के, तर बारावीचा निकाल ९९.७६ टक्के इतका लागला आहे. यंदा करोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावीचा निकाल नववीचे गुण आणि दहावीच्या अंतर्गत गुणांच्या मुल्यांकनावर लावण्यात आला आहे. तर बारावीचा निकाल ११ वी आणि १२ वीच्या अंतर्गत परीक्षेतील गुणांवर आधारित आहे. ICSE दहावीच्या परीक्षेसाठी २ लाख १९ हजार ४९९ विद्यार्थी बसले होते. १ लाख १८ हजार ८४६ मुलं, तर १ लाख ६५३ मुली होत्या. दुसरीकडे ISC बारावीच्या परीक्षेसाठी ९४ हजार ११ विद्यार्थी बसले होते. त्यापाकी ५० हजार ४५९ मुलं, तर ४३ हजार ५५२ मुली होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची
तळीये गावाला भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी तळीये गावाला भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर दुःखाने कोलमडून गेलेल्या ग्रामस्थांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर दिला. राज्यात सध्या विचित्र परिस्थिती उद्भवत असून, जल आराखडा तयार करण्यात येईल, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
बचाव पथके रत्नागिरी, कोल्हापूर,
सांगलीच्या पूरग्रस्त भागात तैनात
औंध लष्करी तळ आणि पुण्यातील बॉम्बे इंजिनिअर समूहाची एकूण 15 मदत आणि बचाव पथके रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्त भागात रात्री तैनात करण्यात आली होती. ही पथके परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत पाण्याखाली गेलेल्या भागात अडकलेल्याची सुटका करण्यात नाग प्रशासनाला मदत करणार आहेत. दक्षिणी कमांडचे जीओसी-इन-सी लेफ्टनंट जनरल जेएस नैन यांनी सांगितले की भारतीय लष्कर या संकटाच्या काळात लोकांच्या पाठीशी आहे आणि सैन्याकडून सर्व मदत पुरवली जाईल.
पूरग्रस्तांना शासनाकडून मोफत
अन्न-धान्य आणि केरोसीनचे वाटप
महापुरामुळे महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्य शासनाकडून मोफत अन्न-धान्य आणि केरोसीनचे वाटप केले जाणार असल्याची माहीती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस
बांगलादेशात करण्यासाठी सज्ज
भारतीय रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस आपला पुढचा प्रवास बांगलादेशात करण्यासाठी सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच ऑक्सिजन एक्सप्रेसची परदेशातील मोहीम ठरणार आहे. आजच, या संदर्भातील दक्षिण पूर्व रेल्वे विभागाअंतर्गत २०० मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी चक्रधरपूर इथल्या टाटा कार्यालयात करण्यात आली आहे. हा ऑक्सिजन बांगलादेशातील बेनापोल येथे जाणार आहे. हा २०० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन भरण्याचे काम आज सकाळी ९.२५ वाजता पूर्ण करण्यात आले.
टपाल विभाग देणार
आधारची ही महत्त्वाची सेवा
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीपीबी) आज जाहीर केले, की त्यांनी भारतीय विशिष्ट ओळखपत्र सेवा (यूआयडीएआय) या पंजीकरण करण्यासाठी आधारकार्डावर मोबाइल नंबर अद्ययावत करण्यासाठी एक सेवा सुरू केली आहे.
दहा लाखाची लाच स्वीकारताना
पोलीस नाईकला अटक
सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल व पोलीस नाईक गणेश लक्ष्मणराव चव्हाण या दोघांनी एका तक्रारदाराकडून सुरुवातीला दोन कोटी रुपयांची लाच मागितली, त्यानंतर तडजोड करत दीड कोटी रुपयांची मागणी केली आणि शेवटी या व्यवहारात दहा लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. या सर्व प्रकाराने खळबळ उडाली आहे. दरम्यान या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादक व सामाजिक कार्यकर्ते
सतीश काळसेकर यांचे निधन
मराठीतील प्रसिद्ध कवी, संपादक व सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. पेण येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. झोपत असतानाच त्यांचं निधन झालं.
चीनची दाणादाण, 1000 वर्षानंतर
झाला भयानक पाऊस
चीनमध्ये 1,000 वर्षांनंतर इतका भयानक पाऊस झालाय की चीनची दाणादाण झालीय. सगळीकडे पाणीच पाणी आहे. रुग्णालयांमध्ये पाणी घुसलंय, रस्ते खचलेत अनेक जणांचा जीव गेलाय, काही जण बेपत्ता आहेत तर शेकडो बेघर झालेत.
पावसामुळे महाराष्ट्रात
शंभरावर मृत्यू
महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये पावसामुळे शंभरावर मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे.
SD social media
9850 60 3590