अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लिल चित्रपट बनवणं आणि ते प्रदर्शित केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केली. राज कुंद्रा याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा याच्या अटकेवर मिका सिंह, राखी सावंत, पुनम पांडे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यानंतर आता अभिनेत्री कंगना रनौतनेही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. या प्रकरणातही कंगनाने आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने फिल्म इंडस्ट्रीची तुलना गटाराशी केली आहे.
कंगना रनौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तीने म्हटलं आहे ‘याच कारणामुळे मी फिल्म इंडस्ट्रीला गटार बोलते. प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसते. मी माझा आगामी प्रोजेक्ट टीकू वेड्स शेरुच्या माध्यमातून बॉलिवूडचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे, आपल्याला मनोरंजन विश्वात एक मजबूत मूल्य प्रणालीची गरज आहे’ या आशयाची स्टोरी पोस्ट करत कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूड फिल्मच्या नावाखाली राज कुंद्रा पोर्न फिल्म बनवण्याचं रॅकेट चालवत होता, असा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. सोमवारी रात्री राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात. दरम्यान, हॉटशॉट नावाची ही अॕप कंपनी आपण 25 हजार डॉलरला प्रदीप बक्षीला विकली होती, असा दावा राज कुंद्रानं मंगळवारी कोर्टात केला.