नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या 16 जागांसाठी 106 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या 31 जागांसाठी 168 अर्ज दाखल झाले आहेत. नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत शिवसेना, भाजप आणि आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या 16 जागांसाठी 106 अर्ज दाखल झाले आहेत. तर तर पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या 31 जागांसाठी 168 अर्ज दाखल झाले आहेत. या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी एकत्र लढणार आहे. तर शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.
नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे विरोधी पक्षनेते अनिल बिधान यांचे तिकीट तापले आहे. अनिल बिधान यांनी बंडखोरी करत आपला अर्ज दाखल केला होता. तर काँग्रेसने ज्योती राऊत यांना डच्चू दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी कोणला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याबाबतच्या प्रस्तावाला उत्तर न दिल्यामुळे शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढण्याची घोषणा स्थानिक पातळीवर केली होती. त्यामुळे सेना, भाजप आणि आघाडी अशी तिरंगी लढत नागपुरात पाहायला मिळणार आहे.
नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवण्याचा प्रस्ताव स्थानिक शिवसेनेने राष्ट्रवादीला दिला होता. मात्र राष्ट्रवादीने शिवसेनेच्या प्रस्तावाला कोणतंही उत्तर दिलं नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली. नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 61 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.
शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी दिली. “कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून सेना स्वबळावर पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे” असं आशिष जैसवाल यांनी सांगितलं. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असं चित्र पाहायला मिळणार आहे.
दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेनंतरही नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीने हातात हात धरला आहे. नागपूर जिल्हा परिषदेत दोन्ही पक्ष एकत्र पोटनिवडणूक लढवण्याबाबत शिक्कामोर्तब झालं. दोन्ही पक्षात जागावाटपासाठी सार्वत्रिक निवडणुकीचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे.