अकोला जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

जुलै महिना उजाडला तरी अकोला जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालं आहे. अकोला जिल्ह्यात अद्याप 70 टक्के क्षेत्रात पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून त्यांच्यावर पुन्हा आर्थिक संकट ओढावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात यंदा मान्सून हा वेळेवर दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. राज्यात दमदार पाऊस बरसणार आणि पिकंही चांगले होणार अशी अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला होती. पण सुरुवातीचे काही दिवस बरसल्यानंतर पावसाने अक्षरशः पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सद्यस्थितीत अकोला जिल्हात अधूनमधून थोड्या फार सरी कोसळतात. यामुळे काही प्रमाणात पिकाला जीवदान मिळत आहे. अकोला जिल्ह्यामध्ये 29 टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र, जुलै महिना उजाडला, तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये 70 टक्के पेरण्या रखडल्या आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच येत्या दोन – चार दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास पिके सुकू शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा मायबाप शेतकरी हा चिंतेत सापडला आहे.

अकोला जिल्हात आतापर्यंत सरासरीपेक्षा 95.5 मिमी पाऊस पडला आहे. अकोल्यात आतापर्यंत 170 मिमी पावसाची अपेक्षा होती. पण 95.5 मिमी पाऊस पडल्याने 70 टक्के पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात जर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन उपलब्ध आहे ते शेतकरी पिकांना पाणी देऊन पिके जगवत आहे. पण कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.