१४ जून२०२०ला अभिनेता सुशांतसिंग राजपूतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडे या दोघांची नावं गेल्या वर्षी मुख्य बातमी ठरली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर काय घडलं हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याचबरोबर आता एक बातमी समोर येत आहे की, बिग बॉस 15 मध्ये रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडे दोघेही एकत्र दिसू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार दोन्ही अभिनेत्रींना संपर्क साधण्यात आला आहे.
असं म्हटलं जातय की, बिग बॉस 15 मध्ये भाग घेण्यासाठी रिया आणि अंकिता लोखंडे दोघेही चर्चेत आहेत पण अद्याप या वृत्ताची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. असंही म्हटलं जात आहे की, बिग बॉस 14 संपल्यानंतर आता त्याच्या 15व्या सीझनची तयारी जोरात सुरू आहे. आणि येत्या काही दिवसांत त्याबद्दल बरेच काही रिवील होऊ शकतात.
जर अहवालांवर विश्वास ठेवला गेला तर, पुन्हा एकदा बिग बॉस 15 मध्ये सामान्य आणि सेलिब्रिटींचा फॉर्मेट दिसेल. म्हणजेच मागील वर्षीप्रमाणे या शोमध्ये सेलिब्रिटी असतील, तसंच काही सामान्य लोकांनाही शोमध्ये एन्ट्री दिली जाईल. ज्यासाठी जनतेद्वारे मतदान केलं जाईल. जे काही सामान्य निवडले गेले ते शोचा एक भाग असतील.
बिग बॉससाठी रिया आणि अंकिता दोघांनाही संपर्क साधला जात असल्याचं माध्यमांच्या बातम्यांमध्ये म्हटलं जात आहे. पण कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये हे दोघं एकत्र दिसणे शक्य वाटत नाही. सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूचा विषय निकाली निघाला असला तरी संपलेला नाही.
अंकिताने गेल्या वर्षी सुशांतच्या कुटुंबाला ज्या प्रकारे पाठिंबा दर्शविला आणि रियाला सुशांतच्या कुटूंबाचा आणि चाहत्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्याच्याकडे पहिलं तर दोघांनाही एका शोमध्ये एकत्र दिसण्याची शक्यता दिसत नाही.