चीनची सायबर आर्मी भारतात मोबाईल डेटा चोरणार

चीनने पुन्हा एकदा भारताला लक्ष्य केलं आहे. भारतात चीनी नागरिकांनी एक सायबर आर्मी तयार केली आहे. जी भारतीय नागरिकांच्या थेट घरात प्रवेश करणार आहे. ही सायबर आर्मी मोबाइल डाटा चोरणार आहे. एवढंच नव्हे तर मेहनतीने कमावलेल्या रक्कमेवरही चीन आर्मीचा डोळा आहे. यामुळे आता प्रत्येक भारतीय नागरिकाने सावधान राहणं गरजेचं आहे.

कोरोना व्हायरस चीनकडून मिळाल्याचं समजलं जातं. भारतासह जगभरात कोरोना व्हायरसचा धोका निर्माण झाला. सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आलं. अगदी बाजार, ऑफिसेस बंद करण्यात आले. या अशा आर्थिक संकटाच्या परिस्थितीतही चीन भारताला आणि भारतीय नागरिकांना वेढीस धरत आहे.

चीनने चक्क लॉकडाऊनच्या काळात घरात असलेल्या लोकांना लुबाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चीनमध्ये बसलेल्या 5 ते 6 नागरिकांना पावर बँक, लाइटनिंग पावर बँक, सन फॅक्ट्री, इजी प्लान, पॉकेट वॉलेट नावाचे पाच चीनी ऍप तयार केले आहेत. याला यूट्यूब, टेलीग्रममधून डाऊनलोड करून पैसे 24 दिवसात दुप्पट करण्याची ऑफर लोकांना दिली आहे. आपल्या या हा प्लान करण्यासाठी भारतीय लोकांना लुबाडण्याचा चीनचा प्लान आहे.

दिल्ली सायबर सेलचे डीसीपी अनियेश रॉय यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘आम्हाला सोशल मीडियावर लोकप्रिय होणाऱ्या काही ऍपवर शंका आली. जेव्हा त्याबाबत माहिती मिळवली तेव्हा आम्हाला धक्काच बसला. यानंतर या ऍपशी संबंधित असलेल्या व्यक्तींना अटक करण्यात आली. हे सगळे लोक चीन नागरिकांच्या सांगण्यावरून काम करत होते.’

150 करोडहून अधिक लोकांचा डाटा चोरला

आतापर्यंत मिळालेल्या माहितीमध्ये यांनी चीनी ऍपच्या माध्यमातून 150 करोडहून अधिक लोकांना लुबाडलं असून तो पैसा परदेशात पाठवला आहे. पोलिसांना आतापर्यंत लुबाडलेल्या लोकांपैकी 2 पेमेंट गेटवेमधून 5 लाख लोकांची माहिती मिळाली आहे. यूपीआयद्वारे पाठवलेल्या पैशांची माहिती अद्याप आलेली नाही.

यावरूनच चीनचं हे ऍप किती लोकप्रिय झालं याचा अंदाज आपण लावू शकतो. एकाचवेळी हे ऍप 50 लाखहून अधिक लोकांनी लुबाडलं आहे. ‘पावर बँक’ नावाचं ऍप प्ले स्टोरवर टॉप फाइव ऍपमध्ये आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ऍप ज्या मोबाइलमध्ये डाऊनलोड केलं जाईल त्या मोबाइलचा सर्व डाटा हॅक होईल.

गुरूग्रामचे राहणारे सीए अविक केडियाने 110 सेल कंपन्या बनवून चीन नागरिकांना ट्रान्सफर केले आहेत. सीए केडियाने एका कंपनीकरता 3 लाख रुपये घेतले आहेत. तर सीए रौनक बंसल दिल्लीचे आहेत. डीसीपी यांच्या माहितीनुसार, ‘जेव्हा आम्ही मनी ट्रेलला पाहिलं तेव्हा हा पैसा पेमेंट गेटवेच्या माध्यमातन सगळ्या सेल कंपन्यांमध्ये जात आहे. याच्यामार्फत करोडो रुपये वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये गेले आहे. त्यानंतर मनी लाँडरिंगच्या माध्यमातून 25 च्या आसपास सेल कंपन्या आणि त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये पाठवले आहेत.’

लोकांना लुबाडणाऱ्या या मॉडेलचं डिझाइन वेगळ्या पद्धतीचं आहे. या चीनी ऍपला डाऊनलोड केल्यानंतर यामध्ये 300 रुपये ते लाखो रुपयांची गुंतवणूक करू शकता. ही रक्कम 24 दिवसांत दुप्पट होऊ शकते. लोकांना विश्वास वाटावा म्हणून त्यांनी गुंतवणूक केलेल्या रक्कमेच्या 10 टक्के रक्कम तातडीने अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केली जाते. तर उरलेली रक्कम काही दिवसांत मिळण्याचं आश्वासन देखील दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.