कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाल आता नवी मुंबईत जागा मिळणार आहे. मार्केटिंग आणि दूध विक्रीसाठी सिडकोची पाच एकर जागा गोकुळ दूध संघाला देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सत्तांतरानंतर गोकुळ दूध संघाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने अजित पवारांची भेट घेतली, त्यावेळी यासंदर्भात घोषणा करण्यात आली. मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार आहोत, असे सूतोवाच काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विजयानंतर दिले होते.
मार्केटिंग आणि दूध विक्रीसाठी नवी मुंबईत वाशीमध्ये जागा निश्चित करण्याचे आदेश अजित पवार यांनी सिडकोला दिले आहेत. त्यानुसार सिडकोची पाच एकर जागा गोकुळ दूध संघाला मिळणार आहे. सत्तांतरानंतर गोकुळ संचालक मंडळाने घेतलेल्या भेटीवेळी अजित पवार यांनी जागेसंदर्भात घोषणा केली. नव्या जागेमुळे मुंबईतही गोकुळचे प्रस्थ वाढणार आहे. संचालक मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे दिग्गज नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचीही यावळी भेट घेतली.
गेल्या महिन्यात झालेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत अखेर सत्तांतर झालं. गोकुळ दूध संघावर सतेज पाटील-हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने विजय मिळवला. गोकुळ दूधसंघातील महादवेराव महाडिक आणि आमदार पी एन पाटील गटाच्या तब्बल तीन दशकांच्या सत्तेला सतेज पाटील गटाने शेवटी सुरुंग लावला. गोकुळ दूध संघाच्या 21 पैकी 17 जागा या काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या आघाडीला मिळाल्या. सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलं.
गोळुळ दूध संघाची निवडणूक जिकंल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी “दूध उत्पादकांनी चांगलं यश दिलं. मनापासून डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार मानतो. हा दूध संघ मल्टिस्टेटच्या माध्यमातून कोण्याच्या घशात जाऊ नये, ही आमची भावना आहे. निवडणूक आता संपलीये, काल कोणी काय केलं यावरून आम्ही निवडणूक आलोय. आता आमचा नवा अजेंडा असणार आहे. मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार आहोत. शेतकऱ्यांना 2 रुपये दर वाढवून देणार आहोत.