आज ‘वर्ल्ड नो टोबॅको दिवस’ ज्याला आपण ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ असं म्हणू शकतो. तंबाखूमुळे शरीरास किती अपाय होतात आणि किती जीवघेणे आजार आपल्याला विळखा घालतात हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. कर्करोग हा त्यातीलच एक आजार. तंबाखू हा आरोग्यास हानिकारक आहे, तंबाखू चे व्यसन सोडा हा संदेश देणारा आजचा विशेष दिन.
३१ मे ला जागतिक तंबाखू विरोधी दिन हा का साजरा केला जातो
मित्रांनो, हा दिवस ३१ मे रोजी पाळण्याचा उद्देश जगभर हानिकारक तंबाखूचे दुष्परिणामाची माहिती पोहचावी आणि जनजागृती व्हावी या करिता जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस साजरा करण्याचे ठरवले आणि चर्चेअंती त्यांनी १९८७ साली यावर अंतिम ठराव संमत केला. जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ सालापासून दरवर्षी ७ एप्रिल रोजी ‘वर्ल्ड नो टोबॅको डे’ पाळला जाईल अशी घोषणा केली, या तारखेला जागतिक आरोग्य संघटनेला ४० वर्षे पूर्ण होत होती म्हणून हा दिवस ठरवण्यात आला, परंतु काही कारणास्तव हा दिवस बदलण्यात आला आणि ३१ मे हा दिन निश्चित करण्यात आला. म्हणून १९८८ सालापासून दर ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन (Word No tobacco day) पाळण्यात येतो.
तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: 36 टक्के पुरुष व 5 टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यात सिगरेटचे व्यसन घातकच डॉक्टरांच्या मते तंबाखूच्या धुरा मध्ये ७००० केमिकल्स असतात ज्यापैकी ५० केमिकल्समुळे कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही कोणा धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर हे केमिकल्स तुमच्या शरीरातही प्रवेश करतात आणि जास्त वेळ राहतात. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की एखादा व्यक्ती फुफ्फुसाच्या कर्करोगाने मेला पण त्याने कधीच व्यसन केलं नव्हतं, तर मित्रांनो त्याचा जीव याच पद्धतीने गेलेला असतो. त्यामुळे धुम्रपान पासून दूर राहवे व धूम्रपान करणाऱ्यांपासून सुद्धा दूरच राहायला हवे.
तंबाखू : चुना लावून तंबाखू बघण्याची प्रथा, आवड आपल्या देशात आहे गालाजवळ तंबाखू ठेवली जाते त्यात लाल स्त्राव जास्त होतो वतला भागवली जाते ग्रामीण व अशिक्षित लोकांमध्ये याचे प्रमाण खूपच आहे
तंबाखूचे दुष्परिणाम
पचन संस्थेवरील दुष्परिणाम
अति तंबाखू सेवनाने ऍसिडिटी नावाचा विकार होतो रुग्णास पोटात छातीत जळजळ खूप चक्कर येणे मळमळ उलटी या तक्रारी दिसून येतात वारंवार अपचनाचा त्रास सुद्धा होतो Poptic Ulcer वारंवार होणारी ॲसिडिटी त्यात तंबाखूच्या अतिसेवनामुळे पुढे पुढे Poptic Ulcer चा त्रास आढळून येतो रुग्णाचे उपाशी पोटी किंवा जेवणानंतर दोन तासानंतर पोट दुखी सुरू होते एक प्रकारची भीती त्याच्या मनात निर्माण होते परिणामी त्याचे वजन घाटाला लागते तो कृश होतो त्याची शक्ती कमी होते अर्थात हे दुरगामी परिणाम आहेत
रक्त वहन संस्था (हृदय)
तंबाखू खाणाऱ्या व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकचे परिणाम खूपच आढळून येते व ते पुरुषांमध्ये अधिक आहे तसेच अति तंबाखू खाल्ल्याने त्यातील निकोटीन नामक घातक पदार्थ रक्तावाटे पसरतो त्यामुळे पुढे कॅन्सर सारखे दुर्धर रोग होतात
पोटाचा कॅन्सर
आधीच तंबाखूच्या अधिवेशनाने ऍसिडिटी अल्सर अशी पार्श्वभूमी तयार झाली असते त्यात पुन्हा तंबाखूचे व्यसन यामुळे पोटाचा कॅन्सर होतो उलटीतून काळपट रक्त बाहेर पडते फारच वेदना होतात रक्ताची कमतरता भासते व खूपच वजन घटते पांढरेपणा येतो अन्न पचत नाही इतर तक्रारी बळावतात.
तंबाखूच्या सेवनाने शौचास साफ होते म्हणून थोडी खावी असा समज आहे परंतु तो फक्त समज आहे त्या मागील मानसिकतेचा मोठा भाग आहे हे मात्र लक्षात ठेवावे.
Peripheral Neutitis
अति तंबाखू सेवनाने जीवनसत्वाचा अभाव आढळतो त्यामुळे चेतना संस्था (Nerves) आवश्यक जीवनसत्व न मिळाल्याने त्यातील संवहनाची प्रक्रिया मँगो ते परिणाम रूप आता पायाला मुंग्या येणे बधीरता येणे आग होणे ही लक्षणे आढळून येतात
फायब्रोसिस (Fibrosis) ओरल असेल जर दीर्घ काळ टिकला तर त्याचे रूपांतर पुढे Fibrosisi या टप्प्यात होते म्हणजेच अल्सर भरत भरत Fibres पेशींची वाढ होते परिणाम रूप येथील सभोवतालच्या पेशी एकमेकास चिकटतात.
खालील प्रमाणे लक्षणे
1- तोंड उघडता न येणे (Trismus)
2- बोलताना त्रास होणे
3- जेवताना त्रास होणे इ
वारंवार तोंड येणे (Stomatitis)
सतत गुटका घडल्याने व्हिटॅमिनची कमतरता भासते त्यानंतर तोंडाचा आले पडतात तोंडातील त्वचाही मुलायम असते त्यामुळे त्यावर दुष्परिणाम लगेच आढळून येतात त्यात झाले बोलताना त्रास खाताना त्रास तोंडाचा दुर्गंध तसेच अति प्रमाणात लाल स्त्राव ही लक्षणे आढळतात
Oral Ulcer
अति प्रमाणात अति वेळा गुटखा खाणाऱ्या व्यक्तींमध्ये ही तक्रार आढळून येते यात गालाला आतून घशा जवळ मोठी जखम स्वरूप वर्णन तयार होतो याचा फार त्रास होतो जर यात जंतुसंसर्ग झालाच तर रुग्णाला ताप येतो डोके दुखते त्या जागी खूपच दुखते वर्णाचा गाभा अतिशय लाल असतो आजूबाजूच्या पेशींना सूज येते बोलताना त्रास होतो,तोंड उघडताना त्रास होतो.
तोंडाचा कॅन्सर (Oral Cancer)
हा शेवटचा टप्पा होय आधीच भारतात मुख कर्करोग प्रामुख्याने दिसून येतो त्यात अशा सवयी म्हणजेच कर्करोगास आमंत्रण मोठी वाढ Tumour जखम असे याचे स्वरूप असते भूक मंदावते वजन घटते, ताप असे प्रचंड वेदना हे लक्षणे दिसून येतात.