रेल्वे प्रवास धोक्याचा? सिग्नल यंत्रणेबाबत मंत्रालयाचा धक्कादायक अहवाल
बालासोर येथे जून महिन्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे हा तिहेरी रेल्वे अपघात घडल्याचं समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासन सक्रिय झालं आहे. यादरम्यान, रेल्वे मंत्रालयाने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, जून महिन्यात देशभरातील विविध रेल्वे स्थानकांवर एकूण ७ हजार २१६ वेळा सिग्नल यंत्रणा बिघडली होती. न्यूज १८ ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.रेल्वे मंत्रालयाच्या अहवालानुसार, जून महिन्यातील एकूण आकडेवारीनुसार दिवसाला सरासरी २४० वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. म्हणजेच एकट्या जून महिन्यात तब्बल ७ हजार २१६ वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यापैकी उत्तर भागात सर्वाधिक म्हणजे १६९० वेळा सिग्नल यंत्रणा बिघडली होती.
सलग पाचव्या जेतेपदासाठी जोकोविच कोर्टवर
विम्बल्डन 2023 मध्ये महिला एकेरीत चेक रिपब्लिकच्या वोंड्रोसोवाने विजेतेपद पटकावलं तर पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्कारेज यांच्यात सामना रंगणार आहे. विम्बल्डनचं सलग पाचवं जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने नोवाक जोकोविच आज कोर्टवर उतरेल. जगभरातील टेनिस प्रेमींचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले आहे.IPL विजेत्या संघापेक्षा जास्त रक्कम विम्बल्डनमध्ये महिला आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणाऱ्या खेळाडुला मिळतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 11 टक्के जास्त प्राइज मनी मिळणार आहे. महिला आणि पुरुष एकेरीच्या विजेत्यांना 24.49 कोटी रुपये मिळतील. तर अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्यांनाही मोठी रक्कम मिळणार आहे.
महायुती राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या सर्वच जागा जिंकणार -उदयनराजे
भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या सर्वच जागा जिंकत महाविजय मिळवणार असल्याचा दावा उदयनराजेंनी केला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या डबा (टिफिन)बैठकीत खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, सुरभी भोसले,सुनील काटकर, काका धुमाळ आदी उपस्थित होते.
आमदार रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या हडपसर भागातील असलेल्या जनसंपर्क कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना मध्यरात्री घडली. या प्रकरणी सुरक्षा रक्षकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यालयाजवळील सायकल आगीत जळाली आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणात तीन जणांनी आग लावल्याचे आढळून आले आहे. हडपसर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. हडपसर परिसरात आमदार रोहित पवार यांचे सृजन हाऊस इमारतीत जनसंपर्क कार्यालय आहे. त्यांच्या या कार्यालयात शनिवारी मध्यरात्री तिघांनी प्रवेश करुन आग लावली. आगीत एक सायकल जळाली आहे. कार्यालयाला आगीची झळ पोहोचली आहे.
अधिवेशनाआधी धनंजय मुंडे यांना धक्का; झेडपी सभापतीसह राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते BRS मध्ये
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादीतर्फे 8 लोकांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाची लॉटरी लागली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नुकताच त्यांचा परळीमध्ये भव्य सत्कार करण्यात आला. या घटनेला काही तास उलटत नाही तोच धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शकडो कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात जाहीर प्रवेश घेतला आहे. यात धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचाही समावेश आहे.
‘घोडा मैदान काही लांब नाही’, राष्ट्रवादीच्या व्हीपवर अजित पवारांची सूचक रिएक्शन
महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार 17 जुलैपासून सुरूवात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर होणारं हे पहिलंच अधिवेशन आहे. 2 जुलैला अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आपल्यासोबत सर्वाधिक आमदार असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे, एवढच नाही तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही दावा सांगितला आहे. निवडणूक आयोगालाही याबाबत माहिती देण्यात आली असून अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे.
कावड यात्रे दरम्यान मोठी दुर्घटना, विजेच्या धक्क्याने 6 भक्तांचा मृत्यू
मेरठमध्ये शनिवारी विजेच्या हायटेंशन वायरच्या खाली आल्याने कावड यात्रेसाठी निघालेल्या 6 भक्तांचा जागीच मृत्यू झाला आहे. यासोबतच 10 भक्त जखमी झाले असून त्यांना मेरठच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. या घटनेमुळे आक्रमक झालेल्या भक्तांनी याविषयी नाराजी व्यक्त करून यासाठी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना कारणीभूत ठरवले आहे.हा अपघात मेरठच्या भवानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. येथे मोठे डीजे कावड हरिद्वारहून पाणी घेऊन मेरठला पोहोचले होते. गावात प्रवेश करण्यापूर्वी विजेची हायटेन्शन लाईन बंद केली जावी असे वीज विभागाला सांगण्यात आले होते. मात्र हाय टेंशन लाइन सुरूच राहिल्याने डीजे कावड हाय टेन्शन वायरला धडकली.
दीप अमावस्या का साजरी केली जाते? काय आहे महत्त्व?
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमवस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरु होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे.दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या होय. या दिवशी दीप पूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतिक आहे. त्यामुळे अनेक चांगल्या-वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे. मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणार्या महिन्याची सुरूवात होते. पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ही दीपअमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते.
SD Social Media
9850 60 3590