जैन समाजाच्यावतीनं दोन वेळेचे मोफत जेवण देण्याचा अभिनव उपक्रम जैन समाजाच्या वतीने हाती घेण्यात आला. दिवसाकाठी दीडशे ते दोनशे रुग्णांना जेवणाचे डबे पोहोचवण्याचे काम सुरू असून आतापर्यंत साडेसात हजारहून अधिक जेवणाच्या डब्यांचे वाटप केले जात आहे.
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव व परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे रुग्ण व नातेवाईकांचे जेवणाचे हाल होत होते. हे पाहून पिंपळगाव बसवंत येथील जैन समाज बांधवांनी एकत्र येत गेल्या महिन्याभरापासून अन्नदानाचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. दिवसाकाठी दीडशे ते दोनशे रुग्णांना जेवणाचे डबे पोहोचवण्याचे काम सुरू असून आतापर्यंत साडेसात हजारहून अधिक जेवणाच्या डब्यांचे वाटप केले, असल्याची माहिती अल्पेश पारेख यांनी दिली. जैन समाजातर्फे राबवण्यात येत असलेल्या उपक्रमाचे वैद्यकीय क्षेत्रातून ही स्वागत करण्यात येत असल्याचं डॉ. चेतन काळे यांनी सांगितलं.
लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्यानं गैरसोय
नाशिक जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका निफाड आहे. कोरोनाबाधित रुग्ण पिंपळगाव बसवंत येथे उपचारासाठी येत असतात. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने रुग्ण व नातेवाईकांचे जेवणाचे खूप मोठे हाल होत होते. जैन समाज बांधवांनी गेल्या महिनाभरापासून जेवणाची सोय केल्यानं रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय टळली असल्याचं भरत पवार यांनी सांगितलं.